अशक्तपणा म्हणजे, ज्यात रक्तातील निरोगी रक्तपेशींची संख्या कमी होऊ लागते. रक्तपेशी शरीरासाठीचं महत्त्वाचं काम करत असतात, एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी ऑक्सिजन वाहून नेत असतात. अशक्तपणा असेल तर सतत थकवा जाणवतो, त्वचा पिवळी पडते, नखं तुटतात, चक्कर येते आणि भूक कमी लागते. अशा वेळी, लोहाची कमतरता वेळेत पूर्ण करणं महत्वाचं आहे.
advertisement
Flax Seeds : आरोग्यासाठी उपयुक्त जवस, जवसाच्या बियांचे फायदे
क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट रिद्धी पटेल यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. लोहाची कमतरता असेल तर आहारात या तीन पदार्थांचा समावेश करावा. या पदार्थांमधून शरीराला भरपूर प्रमाणात लोह मिळतं.
लोहयुक्त पदार्थ
पांढरे आणि काळे तीळ -
शंभर ग्रॅम तिळांत 14 ते 16 मिलीग्राम लोह असतं. यासाठी, दररोज एक ते दोन चमचे भाजलेले तीळ खाऊ शकता. तिळाची चटणी बनवू शकता, तिळाचे लाडू बनवू शकता किंवा रोजच्या जेवणावर तीळ शिंपडू शकता.
राजगीरा -
राजगीरा हे लोहाचं भांडार म्हटलं जातं. शंभर ग्रॅम राजगीरात 7 ते 9 मिलीग्रॅम लोह असतं. राजगीरा लापशीसारखा शिजवून खाऊ शकतो, त्यापासून लाडू बनवता येतात किंवा त्यापासून पोळी बनवता येते. लोह समृद्ध असण्यासोबतच, राजगीरा हे धान्य ग्लूटेन मुक्त देखील आहे.
Cardamom : स्वादाबरोबरच औषधी गुणधर्मांसाठीही उपयुक्त, हिरव्या वेलचीचे भरपूर फायदे
उडदाची डाळ
शंभर ग्रॅम उडदाच्या डाळीत सात ते नऊ मिलीग्राम लोह असतं. डोशासाठीच्या मिश्रणात घालू शकता किंवा इतर डाळींसोबत मिसळून उडद डाळ खाऊ शकता.
शरीरात लोहाचं शोषण वाढवण्यासाठी, जेवणानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणं टाळा. दुसरा मार्ग म्हणजे व्हिटॅमिन सी सोबत लोह घेणं. लिंबू, टोमॅटो किंवा आवळ्यासोबत लोह असलेले घटक घेतले तर शरीर लोह चांगल्या प्रकारे शोषू शकतं.