Cardamom : स्वादाबरोबरच औषधी गुणधर्मांसाठीही उपयुक्त, हिरव्या वेलचीचे भरपूर फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
स्वयंपाकासाठी अनेक प्रकारच्या पदार्थांत हिरवी वेलची वापरतात. त्याचा सुवास आणि चवीमुळे पदार्थ सुंदर लागतो. पण याच्या चवीसोबतच आरोग्यासाठी देखील वेलची खूप फायदेशीर आहे.
मुंबई : आपल्या स्वयंपाकघरात ठेवलेली छोटी वेलची आपल्या शरीरातील असंख्य आजार बरे करण्यासाठी फायदेशीर आहे. साधारणपणे, स्वयंपाकासाठी अनेक प्रकारच्या पदार्थांत हिरवी वेलची वापरतात. त्याचा सुवास आणि चवीमुळे पदार्थ सुंदर लागतो. पण याच्या चवीसोबतच आरोग्यासाठी देखील वेलची खूप फायदेशीर आहे. डॉ. विनोद शर्मा यांनी हिरवी वेलची खाण्याचे फायदे सांगितले आहेत.
हिरवी वेलची खाण्याचे फायदे -
- पोटदुखी, गॅस, जळजळ, आंबट ढेकर येणं या समस्या कमी करण्यासाठी वेलची उपयुक्त आहे.
- याशिवाय, बद्धकोष्ठतेची समस्या आणि सकाळी उठल्यानंतर ज्यांचं पोट साफ होत नाही, त्यांच्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी वेलची खाणं फायदेशीर आहे.
advertisement
- ज्या महिलांना ल्युकोरियाचा त्रास आहे त्यांना दोन वेलची चावून पाणी प्यायल्यानं आराम मिळेल.
- रात्री झोपण्यापूर्वी ही वेलची खाल्ल्यानं निद्रानाशाची समस्या दूर होईल. यासोबतच, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही वेलची उपयुक्त आहे.
- एखाद्याच्या तोंडात फोड आले असतील तर वेलची बारीक करून त्याची पावडर फोडांवर लावल्यानं आराम मिळेल.
advertisement
- हिरवी वेलची खाल्ल्यानं उचकी थांबवण्यासाठी उपयोग होतो.
- हिरवी वेलची आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. सांधेदुखी, वजन कमी होणं यासारख्या समस्यांमधेही हिरवी वेलची खाणं खूप फायदेशीर ठरू शकतं.
- सकाळी उठून दोन वेलची घ्यायच्या आणि त्या चावून घ्यायच्या आहेत आणि नंतर पाणी प्यायचं. नियमित सेवन केल्यानं त्याचे फायदे आपोआप दिसून येतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 04, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cardamom : स्वादाबरोबरच औषधी गुणधर्मांसाठीही उपयुक्त, हिरव्या वेलचीचे भरपूर फायदे