Hair Care : पावसाळ्यात केसांची गळती रोखा, या टिप्सचा होईल उपयोग

Last Updated:

पावसाळ्यात काहीवेळा हवा थंड तर काहीवेळा दमट असते. अशा हवेत केसांची काळजी घेणं मोठं आव्हान असतं. या ऋतूत वाढत्या आर्द्रतेमुळे, टाळू अस्वच्छ होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे केस गळण्याची समस्या जास्त जाणवते.

News18
News18
मुंबई : पावसाळ्यात काहीवेळा हवा थंड तर काहीवेळा दमट असते. अशा हवेत केसांची काळजी घेणं मोठं आव्हान असतं. या ऋतूत वाढत्या आर्द्रतेमुळे, टाळू अस्वच्छ होण्याचं प्रमाण वाढतं. यामुळे केस गळण्याची समस्या जास्त जाणवते.
प्रसिद्ध त्वचारोगतज्ज्ञ आणि केश तज्ज्ञ अंकुर सरीन यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनलवर या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी, पावसाळ्यात केसांशी संबंधित वाढणाऱ्या समस्यांबद्दल आणि त्यावरच्या उपचारांची माहिती देण्यात आली आहे.
पावसाळ्यात केस गळती कशी थांबवायची?
तेल लावणं आवश्यक -
तेलामुळे केसांचं नुकसान कमी करण्यासाठी मदत होते, त्यामुळे पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा केसांना तेल लावण्याची शिफारस डॉ. सरीन यांनी केली आहे.
advertisement
हीटिंग टूल्स -
पावसाळ्यात केस आधीच कमकुवत असतात, त्यामुळे हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लिंग आयर्न वापरल्यानं केसांचं आणखी नुकसान होऊ शकतं. हीटिंग टूल्समुळे केसांचा नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि केसांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे, डॉक्टर सरीन या वातावरणात हीटिंग टूल्स टाळण्याचा सल्ला देतात.
advertisement
केस योग्य पद्धतीनं वाळवा
केस वाळवण्यासाठी सामान्य टॉवेलऐवजी मायक्रोफायबर टॉवेल किंवा कॉटन टी-शर्ट वापरण्याचा सल्ला डॉ. सरीन देतात. यामुळे केसांचं नुकसान कमी होतं, केसांची गळती नियंत्रित होते आणि केस जास्त तुटत नाहीत.
रासायनिक उपचारांपासून दूर रहा
केस सरळ करणं, रिबॉन्डिंग करणं किंवा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक उपचारांमुळे केसांची मुळं कमकुवत होतात, जी पावसाळ्यात आणखी धोकादायक ठरू शकतात. डॉ. सरीन विशेषतः पावसाळ्यात अशा रासायनिक उपचारांपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.
advertisement
केसांसाठी पूरक आहार घ्या -
या सर्वांव्यतिरिक्त, आहारातून पुरेशी पोषक तत्वं मिळत नसतील, तर बायोटिन, झिंक, व्हिटॅमिन ई सारखे सप्लिमेंट्स घेतल्यानं केसांना आवश्यक पोषण मिळू शकतं. पण कोणतंही सप्लिमेंट घेण्यापूर्वी, तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : पावसाळ्यात केसांची गळती रोखा, या टिप्सचा होईल उपयोग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement