Neem : कडुनिंबाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, मौखिक आरोग्यापासून पचनासाठीही उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चरक आणि सुश्रुत संहितेनुसार, रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं चावणं खूप फायदेशीर आहे. तोंड स्वच्छ करण्यासाठी, दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी याची मदत होते. रक्त शुद्धीकरण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील ही पानं खूप उपयुक्त आहेत.
मुंबई : आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारक शक्ती, पचन आणि त्वचेवर होतो. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदात रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे सांगितले आहेत.
चरक आणि सुश्रुत संहितेनुसार, रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं चावणं खूप फायदेशीर आहे. तोंड स्वच्छ करण्यासाठी, दात आणि हिरड्या निरोगी ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी याची मदत होते. रक्त शुद्धीकरण आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील ही पानं खूप उपयुक्त आहेत.
रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं चावण्याचे फायदे
advertisement
आयुर्वेदानुसार, कडुनिंबात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म भरपूर असतात, शरीराचं संक्रमणापासून संरक्षण करण्यास यामुळे मदत होते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची 3-4 कोवळी पानं चावून खाल्ली तर पोटाच्या समस्या कमी जाणवतात.
गॅस, बद्धकोष्ठता आणि पोटफुगीसारख्या समस्या असतील तर कडुनिंबाची पानं खाऊ शकता. ती खाल्ल्यानं पोटाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते.
advertisement
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त -
कडुनिंबाच्या पानांमधे आढळणारा रस रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. या पानांत, फ्लेव्होनॉइड्स, ग्लायकोसाइड्स, टेरपेनॉइड्स आणि अँटीऑक्सिडंट्स सारखे घटक असतात. कडुनिंबाची पानं शरीरातील पेशींना इन्सुलिनसाठी संवेदनशील बनवतात, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी संतुलित राहते.
ही पानं त्वचेला आतून डिटॉक्स करतात, ज्यामुळे शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि त्वचा देखील निरोगी होते. मुरुमं असतील तर दिनचर्येत कडुनिंबाची पानं उपयुक्त ठरतात.
advertisement
चयापचयाचा वेग वाढवण्यास मदत - कडुनिंब खाल्ल्यानं चयापचयाचा वेग सुधारतो, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
यकृत - सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं चावल्यानं यकृत निरोगी राहण्यास मदत होते. कडुनिंब यकृताला विषमुक्त करण्यास मदत करते.
दातांचं आरोग्य - सकाळी रिकाम्या पोटी कडुनिंबाची पानं चावल्यानं दात किडण्याचं प्रमाण कमी होतं. मौखिक स्वच्छतेसाठीही कडुनिंब उपयुक्त आहे. कडुनिंबाची पानं चावल्यानं तोंडाची दुर्गंधी दूर होते, हिरड्यांची सूज कमी होते आणि दात मजबूत होतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 25, 2025 7:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Neem : कडुनिंबाच्या पानांचे आरोग्यदायी फायदे, मौखिक आरोग्यापासून पचनासाठीही उपयुक्त