Makhana : मधुमेह नियंत्रणासाठी चांगला पर्याय - मखाणा, शरीरासाठीही फायदेशीर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मखाणा हा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे, म्हणजेच तो रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढवत नाही. याशिवाय, मखाण्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, यामुळे मधुमेह व्यवस्थापन करण्यास मदत होते. वजन व्यवस्थापन, हृदयाचं आरोग्य यासाठीही मखाणा उपयुक्त ठरतो. पण उपयुक्त म्हणून मखाणा खूप खाणंही आरोग्यासाठीही चांगलं नाही.
मुंबई: मधुमेहींना खाण्याच्या बाबतीत काही पथ्य पाळावी लागतात. अनेक पदार्थांमुळे मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होऊ शकते. मखाणा हा त्यातला एक चांगला पर्याय. या पौष्टिक खाद्यामुळे मधुमेह नियंत्रणाबरोबरच शरीरालाही अनेक फायदे मिळू शकतात.
मखाणा हा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे, म्हणजेच तो रक्तातील साखरेची पातळी वेगानं वाढवत नाही. याशिवाय, मखाण्यात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, यामुळे मधुमेह व्यवस्थापन करण्यास मदत होते. वजन व्यवस्थापन, हृदयाचं आरोग्य यासाठीही मखाणा उपयुक्त ठरतो. पण उपयुक्त म्हणून मखाणा खूप खाणंही आरोग्यासाठीही चांगलं नाही.
advertisement
मखाणा भाजूनही खाऊ शकता. मखाण्याच्या अनेक पाककृती आहेत. मसाला मखाणा, मखाणा खीर, मखाणा चिवडा, मखाणा चाट अशा अनेक प्रकारांद्वारे मखाणा खाता येईल.
मखाणा खाण्याचे फायदे -
1. हाडं -
मखाणा हा कॅल्शियमचा एक चांगला स्रोत आहे, हाडांची मजबुती आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या समस्या दूर ठेवण्यासाठी मदत करतो. ऑस्टियोपोरोसिस म्हणजेच हाडांची घनता कमी होते आणि हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं.
advertisement
2. ताण-
मखाण्यात मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे पोषक घटक असतात, यामुळे ताण कमी करण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी मदत होते.
3. रक्तदाब-
मखाणा म्हणजेच कमळाच्या बियांमधे मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतं, यामुळे रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत होते.
4. त्वचा-
advertisement
मखाण्यात अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार ठेवण्यास मदत होते आणि सुरकुत्या कमी करण्यासाठीही मखाणा उपयुक्त आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 6:43 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Makhana : मधुमेह नियंत्रणासाठी चांगला पर्याय - मखाणा, शरीरासाठीही फायदेशीर