Dehydration : डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करायचं, ऐका तज्ज्ञांचा सल्ला
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
दररोज 2 ते 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही अनेकदा थकवा येणं, चक्कर येणं किंवा सुस्ती जाणवणं, ओठ कोरडे होणं असे प्रकार घडतात. पण पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशन का होतं यावर आहारतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. हायड्रेशनसाठी फक्त पाणी पिणं पुरेसं नाही, तर शरीरात पाण्याचं शोषणं होणं महत्वाचं आहे आणि यासाठी इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता असते.
मुंबई : डिहायड्रेशनची समस्या अनेकांना जाणवते. बरेचदा, दररोज 2 ते 3 लीटर पाणी प्यायल्यानंतरही अनेकदा थकवा येणं, चक्कर येणं किंवा सुस्ती जाणवणं, ओठ कोरडे होणं असे प्रकार घडतात. पण पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेशन का होतं यावर आहारतज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. हायड्रेशनसाठी फक्त पाणी पिणं पुरेसं नाही, तर शरीरात पाण्याचं शोषणं होणं महत्वाचं आहे आणि यासाठी इलेक्ट्रोलाइट्सची आवश्यकता असते.
डॉ. श्वेता शाह यांच्या म्हणण्यानुसार, पाणी प्यायल्यानंतरही डिहायड्रेटेड वाटत असेल, तर फक्त साधं पाणी पिऊ नका, तर पाण्यासोबत शरीराला सोडियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स द्या.
मग डिहायड्रेटेशन टाळण्यासाठी कसं पाणी प्यावं हा प्रश्न उरतोच. यासाठी, त्यांनी पाण्यात रॉक मीठ मिसळून ते पिण्याची शिफारस केली आहे.
advertisement
डॉ. श्वेता शाह यांच्या सल्ल्यानुसार, विशेषतः व्यायाम करत असाल, योगा करत असाल किंवा खूप गरम वाटत असेल तर एक लीटर पाण्यात चिमूटभर सैंधव मीठ मिसळा आणि दिवसातून एकदा प्या. यामुळे शरीराला आवश्यक खनिजं मिळतील ज्यामुळे शरीर पाणी लवकर शोषू शकेल.
advertisement
डिहायड्रेशन टाळण्यासाठी त्यांनी आणखीही काही टिप्स दिल्यात -
- आठवड्यातून एकदा ओआरएस किंवा इलेक्ट्रोलाइट पावडर मिसळून पाणी पिण्याची शिफारस डॉक्टरांनी केली आहे. यामुळे शरीरातील खनिजं संतुलित राहतात.
- या व्यतिरिक्त, आहारात काकडी, टरबूज, संत्री, नारळ पाणी यासारख्या घटकांचा समावेश करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळेही शरीराला हायड्रेशन मिळतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 23, 2025 6:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dehydration : डिहायड्रेशन टाळण्यासाठी काय करायचं, ऐका तज्ज्ञांचा सल्ला