Monsoon Care : पावसाळ्यात घ्या पोटाची काळजी, काय आहे आयुर्वेदिक तज्ज्ञांचं मत ?
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पावसाळ्यात पोट खराब होणं म्हणजे वात असंतुलन. या मोसमात, पावसाळ्यात पोटाच्या समस्या येत असतील, तर काही सामान्य घरगुती उपाय करून पोटाच्या समस्या दूर ठेवता येतात.
मुंबई : पावसाळ्यात पाणी साचल्यानं विविध प्रकारचे कीटक वाढतात. हे कीटक पाण्यात किंवा अन्नपदार्थांत जातात. विशेषतः पावसाळ्यात खरेदी केलेल्या पालेभाज्या खूप काळजीपूर्वक खरेदी कराव्या लागतात, अन्यथा त्यातले सूक्ष्म कीटक शरीरात प्रवेश करू शकतात.
पावसाळा म्हटलं की हवामान कधी थंड असतं तर कधी दमट असतं, ज्यामुळे शरीरावर परिणाम होतो आणि आरोग्य बिघडू शकतं. या ऋतूत पोटाशी संबंधित समस्याही जास्त असतात. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा मिश्रा यांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात पोट खराब होणं म्हणजे वात असंतुलन. या मोसमात, पावसाळ्यात पोटाच्या समस्या जाणवत असतील, तर काही साधे सोपे घरगुती उपाय करून पोटाच्या समस्या टाळता येतील.
advertisement
पावसाळ्यात पोटदुखी रोखण्यासाठी उपाय
आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गरम करुन थंड केलेलं पाणी प्यायल्यानं पावसाळ्यात पोटदुखी टाळता येते. याचा अर्थ असा की आधी पाणी उकळवावं लागेल आणि नंतर ते थंड करून प्यावं लागेल. अशा प्रकारे पाणी प्यायल्यानं पचनक्रिया सुधारते.
advertisement
या हवेत, काळी मिरी खाल्ल्यानं पोटालाही फायदा होतो. सुकं आलं म्हणजेच सुंठ देखील पोटासाठी उपयुक्त आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी मधही फायदेशीर आहे. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात सातूचं पीठ आणि पालक खाणं टाळावं. कारण या दोन्हीमुळे पोटात गॅस निर्माण होऊ शकतो.
advertisement
या ऋतूत घरात कडुनिंब, गुग्गुळाचा धूर करणं खूप फायदेशीर आहे. यामुळे जंतू घरापासून दूर राहतात. यामुळे बुरशी येण्यास प्रतिबंध होतो आणि घरात सुवास दरवळतो. पावसाळ्यात पोटाच्या समस्या टाळण्यासाठी, अनवाणी चालणं आणि दिवसा झोपणं टाळा असा सल्लाही डॉ. मनिषा मिश्रा यांनी दिला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 7:20 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Monsoon Care : पावसाळ्यात घ्या पोटाची काळजी, काय आहे आयुर्वेदिक तज्ज्ञांचं मत ?