Meditation : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम - ध्यानधारणा, वाचा सविस्तर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
गेल्या काही दशकांत, ध्यान करणं हे मनासाठी आणि शरीरासाठी किती उपयुक्त आहे यावर अनेकदा संशोधन झालं आहे. जागतिक योग दिनानिमित्तानं ध्यान करण्याचं महत्त्व समजून घेऊया.
मुंबई : ध्यान करणं म्हणजेच मेडिटेशन ही प्राचीन पद्धत आहे, अनादी काळापासून याचा उपयोग होतो आहे. गेल्या काही दशकांत, ध्यान करणं हे मनासाठी आणि शरीरासाठी किती उपयुक्त आहे यावर अनेकदा संशोधन झालं आहे. जागतिक योग दिनानिमित्तानं ध्यान करण्याचं महत्त्व समजून घेऊया.
चिंतेवर उपचार -
चिंतेची पातळी कमी करण्यासाठी ध्यान करणं खूप प्रभावी आहे. यामुळे मज्जासंस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी मदत होते. यासाठी, चिंता, पॅनिक डिसऑर्डर आणि बाहेर समाजात जाणवणाऱ्या चिंता यांच्या उपचारांसाठी माइंडफुलनेस-बेस्ड स्ट्रेस रिडक्शन (MBSR) चाही वापर केला जातो.
ताण व्यवस्थापन -
advertisement
ध्यानधारणेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ताण कमी करणं. ताणावर नियंत्रण ठेवलं नाही तर दीर्घकालीन ताण शारीरिक आणि मानसिक आरोग्याला हानी पोहोचवू शकतो. ध्यान केल्यानं शरीरातील मुख्य ताण संप्रेरक असलेल्या कॉर्टिसोलचं प्रमाण कमी होण्यास मदत होते. नियमित सराव केल्यानं हा ताण कमी होऊ शकतो.
advertisement
ध्यानामुळे एकाग्रता सुधारते -
ध्यान केल्यानं मेंदूची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता मजबूत होते. हार्वर्ड विद्यापीठात याबद्दल अभ्यास करण्यात आला. खूप ताण असतानाही, केवळ आठ आठवडे ध्यान केल्यानं एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते असं यात आढळून आलं आहे.
झोपेची गुणवत्ता सुधारते -
झोप येण्यासाठी त्रास होत असेल तर झोपेच्या गोळ्यांपेक्षा ध्यान करणं अधिक उपयुक्त ठरू शकतं. माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे मन शांत करण्यासाठी मदत होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 21, 2025 6:35 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Meditation : शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सर्वोत्तम - ध्यानधारणा, वाचा सविस्तर