Sleep Tourism : स्लीप टुरिझम, नॅपकेशन म्हणजे काय ? वाचा सविस्तर माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
स्लीप टुरिझम म्हणजे अशा सहली किंवा सुट्ट्या जिथे मुख्य लक्ष चांगल्या झोपेवर असते. आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला चांगली झोप मिळेल अशी जाहिरात पूर्वी काही हॉटेल्सनी केली असेल पण आता त्याची गरज जास्त आहे. स्लीप टुरिझमचं प्रमाण यापेक्षा खूप जास्त आहे आणि ते पुढे वाढत जाणार आहे.
मुंबई : दिवसभर उत्साहात राहायचं असेल तर आधी शांत आणि गाढ झोप महत्त्वाची आहे. झोप अपूर्ण असेल तर दिवसा आळस येतो, उत्साह कमी वाटतो. झोपेचा अभाव आता एक मोठी समस्या बनली आहे. युनायटेड किंगडममधे, 74% नागरिकांना कमी झोप मिळते आणि 5-7 % नागरिक यामुळे म्हणजे झोप पूर्ण होत नसल्यानं थकवा येत असल्याची तक्रार घेऊन डॉक्टरांकडे जातात. यामुळे, चांगली झोप दुर्मिळ होते आहे आणि ही जागतिक समस्या होत असल्याचं दिसतंय.
हे चित्र जगभरात आहे. याच कारणास्तव, आजकाल एक नवीन ट्रेंड खूप लोकप्रिय होत आहे. ज्याला स्लीप टुरिझम म्हणतात. स्लीप टुरिझम म्हणजे अशा सहली किंवा सुट्ट्या जिथे मुख्य लक्ष चांगल्या झोपेवर असते. आमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला चांगली झोप मिळेल अशी जाहिरात पूर्वी काही हॉटेल्सनी केली असेल पण आता त्याची गरज जास्त आहे. स्लीप टुरिझमचं प्रमाण यापेक्षा खूप जास्त आहे आणि ते पुढे वाढत जाणार आहे.
advertisement
यामध्ये आठवडाभर चालणाऱ्या रिट्रीटचा समावेश असतो जिथे झोप सुधारण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं. याशिवाय, झोपेसाठी मदत करणाऱ्या वैद्यकीय चाचण्या आणि उपचार किंवा स्पा उपचार देखील दिले जातात.
एका अहवालानुसार, 2024 मधे या व्यवसायाची किंमत सुमारे 690 अब्ज डॉलर्स असेल आणि 2028 पर्यंत त्यात आणखी चारशे अब्ज डॉलर्सची वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
advertisement
हा ट्रेंड का वाढतोय ?
चांगल्या आरोग्यासाठी केवळ आहार आणि व्यायामाचं नाही तर झोपही तितकीच महत्त्वाची आहे. सुट्टी म्हणजे, कामापासून दूर राहणं आणि कुटुंबासोबतचा वेळ आणि त्यानंतर झोपेला प्राधान्य दिलं जातं. म्हणूनच, हॉटेल्स देखील झोपेशी संबंधित नवीन कार्यक्रम बनवत आहेत.
अशी झोपेची सुट्टी कुठे मिळेल?
या ट्रेंड अंतर्गत, जगभरात झोपेवर केंद्रित अनेक प्रकारच्या सहली उपलब्ध आहेत. स्पेनचे SHA वेलनेस क्लिनिकमधे Medical sleep program ची सुविधा आहे. डॉक्टर प्रथम झोपेचा प्रकार कसा आहे याची तपासणी करतात. घोरणं, श्वास घेण्यास त्रास होणं किंवा वारंवार जागं होणं या प्रकाराचा आधी अभ्यास केला जातो.
advertisement
नंतर जीवनशैली, आहार आणि काही तंत्रांद्वारे झोप सुधारण्याची योजना आखली जाते. न्यू जर्सीमधील लॉन्गव्हिल मॅनर आणि कॅलिफोर्नियातील पोस्ट रॅंच इन सारख्या हॉटेल्सनी झोप तज्ज्ञांच्या आणि sleep expert च्या सहकार्यानं विशेष कार्यक्रम तयार केले आहेत. मालदीवमधील सोनेवासारख्या रिसॉर्ट्समध्ये ग्राहकांचं शरीर आणि मनाला आराम मिळण्यासाठी ध्यान, योग, हर्बल बाथ आणि चांगला सूर्यप्रकाश कुठे मिळतो याची व्यवस्था केली जाते.
advertisement
इटलीमधील लेफे रिसॉर्टमधे झोप सुधारण्यासाठी पारंपारिक चिनी औषधांचा वापर केला जातो. श्रीलंकेतील सांतानी वेलनेस कॅंडी इथे आयुर्वेदिक पद्धतींचा वापर केला जातो, याद्वारे झोप सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातात.
स्लीप टुरिझमचं भविष्य -
तंत्रज्ञानामुळे झोपेचा त्रास होत असला तरी, याच तंत्रज्ञानाचा वापर करून झोप सुधारण्यासाठीही काम केलं जात आहे. झोप आणि स्वप्न तज्ज्ञ म्हणजेच sleep and dream expert चार्ली मोर्ले यांनी लंडनच्या किम्प्टन हॉटेलमधे एक कार्यक्रम तयार केला आहे, ज्यात नागरिकांना व्हीआर हेडसेट दिला जातो. मार्गदर्शित ध्यान करतात आणि विशेष हर्बल चहा पितात. अशा प्रकारे लोक स्पष्ट स्वप्ने पाहू शकतात.
advertisement
म्हणजेच, स्वप्न पाहिल्यानंतर ते ती विसरत नाहीत तर विचार केल्यानंतर जाणीवपूर्वक स्वप्न पाहतात. मग त्यांची स्वप्न एआय आर्टिस्टद्वारे दृश्यांमध्ये रूपांतरित केली जातात. भविष्यात, स्लीप टुरिझम स्मार्ट बेड, डेटा एनेलिसिस आणि तंत्रज्ञानाच्या मदतीनं कोणती पद्धत सर्वात प्रभावी आहे हे देखील पाहता येऊ शकेल. याचा अर्थ असा की, हॉटेल्स केवळ दावा करणार नाहीत तर तुमची झोप कशी होती हे डेटासह सिद्ध करतील.
advertisement
झोपेसाठी ही सर्वोत्तम ठिकाणं -
भारतातील ही ठिकाणं नॅपकेशनसाठी सर्वोत्तम मानली जातात. यात गोवा, कुर्ग, मनाली, ऋषिकेश आणि म्हैसूर या ठिकाणांचा समावेश आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 20, 2025 5:53 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Sleep Tourism : स्लीप टुरिझम, नॅपकेशन म्हणजे काय ? वाचा सविस्तर माहिती