Pimples : मुरुमांची समस्या होईल दूर, आयुर्वेदातला हा उपाय ठरेल फायदेशीर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आयुर्वेदानुसार, शरीरात जेव्हा उष्णता (पित्त) वाढतं तेव्हा ते रक्तात विषारी पदार्थ पसरवू लागतं, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. अशावेळी, मुरुम, लाल पुरळ, सूज किंवा जळजळ होण्याची समस्या वाढते.
मुंबई : चेहऱ्यावर वारंवार येणारे मुरुम ही त्वचेची केवळ बाह्य समस्या नाही तर अनेकदा शरीरातील असंतुलनाचं लक्षण देखील असू शकतं. आयुर्वेदानुसार, विशेषतः पित्त दोष वाढल्यामुळे मुरुमांची समस्या वाढते.
प्रसिद्ध आयुर्वेदिक पोषणतज्ज्ञ श्वेता शाह यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी पित्त दोष शांत करण्यासाठी आणि त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी एक रेसिपी सांगितली आहे.
आयुर्वेदानुसार, शरीरात जेव्हा उष्णता (पित्त) वाढतं तेव्हा ते रक्तात विषारी पदार्थ पसरवू लागतं, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. अशावेळी, मुरुम, लाल पुरळ, सूज किंवा जळजळ होण्याची समस्या वाढते.
advertisement
पण काही खास उपाय वापरुन या समस्येवर इलाज करता येतो. फक्त सात दिवस हा खास उपाय केला तर मुरुमांची समस्या कमी होऊ शकते. हा उपाय त्वचा आतून शुद्ध करणं आणि पित्त शांत करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो.
यासाठी, रात्री तीन ते चार लवंगा पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी भिजवलेल्या लवंगा बारीक करा. त्यात थोडा मध आणि लिंबाचा रस घाला. यासाठी चिमूटभर ताज्या कडुनिंबाच्या पानांची पेस्ट देखील घालू शकता. हे मिश्रण रिकाम्या पोटी खा.
advertisement
रक्त शुद्धीकरण
लवंग आणि कडुनिंब रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त आहेत. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मदत होते. ज्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होते.
पित्त दोष शांत करण्यासाठी उपयुक्त
लवंग आणि लिंबानं शरीरातील उष्णता शांत होते. पित्त शांत झाल्यावर त्वचेची जळजळ, लालसरपणा आणि सूज आपोआप कमी होते.
advertisement
मुरुमांच्या मुळांवर परिणाम
या उपायामुळे, केवळ बाहेरून त्वचा स्वच्छ होत नाही तर आतून त्वचा स्वच्छ करून मुरुम तयार होण्यास प्रतिबंध करण्यास देखील मदत करते.
मुलायम त्वचा
याव्यतिरिक्त, कडुनिंब आणि मधानं त्वचा आतून मॉइश्चरायझ होते, ज्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 24, 2025 7:32 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pimples : मुरुमांची समस्या होईल दूर, आयुर्वेदातला हा उपाय ठरेल फायदेशीर