अंडी खाणं हे चांगलं असतं पण तुम्ही गावरान अंडी खाल्ली तर तू जास्त चांगली असतात कारण की त्या अंड्यांमधून भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, फायबर आणि सर्वच गोष्टी आपल्या शरीराला मिळत असतात. त्यासोबतच गावरान अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटामिन्स असतात. ओमेगा असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. गावरान अंड्यामध्ये फ्लेवर असतात. चव देखील चांगली असते. त्यामुळे जर तुम्हाला देशी अंडी मिळत असतील तर ते खात जावे.
advertisement
तसेच तुम्ही बॉयलर खाऊ शकता. त्यामध्ये देखील अनेक असं पोषक घटक असतात ते देखील आपल्या शरीरसाठी चांगले असतात. तुम्ही कुठल्याही प्रकारची जर अंडी जर खात असाल तर ती तुम्ही चांगल्या क्वालिटीची घ्यावीत. तसंच तुम्ही अंडी जी आहेत ती तुम्ही कुठल्याही फॉर्ममध्ये खाऊ शकतात. तुम्ही त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश करून खाऊ शकता किंवा नुसतं बॉईल करून देखील अंडे तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला दररोज अंडे खायचे असेल तर तुम्ही गावरान अंडी ही खावी कारण की बॉयलर अंड्या पेक्षा ती अंडी जास्त चांगली आहेत, असं आहार तज्ज्ञ जया गावंडे सांगतात.





