थंडीच्या दिवसात योग्य आहार घेतल्यानं आपल्याला निरोगी राहण्यास मदत होते. या दिवसांत नेहमीच्या जेवणाव्यतिरिक्त फळं, सुका मेव्याचाही आहारात समावेश करावा. पण काहींना सुका मेवा नुसता खाल्ल्यानं बाधू शकतो, अशावेळी काही जण सुका मेवा भिजवून खातात. तसंच हिवाळ्यात मनुका किंवा बेदाणे भाजून खाणं फायदेशीर ठरु शकतं. आधीच पौष्टिक घटक असलेला हा सुका मेवा भाजल्यानंतर आणखीनच पौष्टिक बनतो. जाणून घेऊया हिवाळ्यात भाजलेले मनुके खाल्ल्यानं कोणते फायदे होतात.
advertisement
Wrinkles : चेहऱ्यावरच्या सुरकुत्या घालवण्यासाठी हे उपाय नक्की करुन बघा, त्वचा दिसेल तजेलदार
हिवाळ्यात अनेकदा लोकांना थकवा जाणवतो, अशा परिस्थितीत भाजलेल्या मनुका/बेदाणे खाल्ल्यानं शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील थकवा दूर होण्यास मदत होते. यामध्ये आढळणारी नैसर्गिक कर्बोदकं शरीराला ऊर्जा प्रदान करण्यास मदत करतात. व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मनुकांमध्ये आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हिवाळ्याच्या मोसमात अनेकांना पचनसंस्थेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं आणि अन्न खाल्ल्यानंतर त्यांना पचन आणि बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावते.
Facial : घरीच करा गोल्डन फेशियल, सात दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावर येईल चमक
या नागरिकांसाठी भाजलेल्या मनुका खाणं खूप फायदेशीर ठरु शकतं. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि बोरॉनसारखे पोषक घटक असतात, ज्यामुळे हाडं मजबूत होतात. सांधेदुखीपासून आराम मिळतो. तुम्ही भाजलेले मनुके/ बेदाणे सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसाच्या कोणत्याही वेळी नाश्ता म्हणून घेऊ शकता. पण हे खाण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला दाणे किंवा सुक्या मेव्याची अलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. सुका मेवा काहींना पचनासाठी जड होऊ शकतो. त्यामुळे सुका मेवा प्रमाणात खा.