Facial : घरीच करा गोल्डन फेशियल, सात दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावर येईल चमक
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
चेहरा कोरडा वाटत असेल आणि तुम्ही फेशियल करायच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी...कारण फेशियलसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, आता एक आठवड्यात घरबसल्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल पण त्यासाठी 7 दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करावं लागेल.
मुंबई : चेहरा कोरडा वाटत असेल आणि तुम्ही फेशियल करायच्या विचारात असाल तर ही माहिती तुमच्यासाठी...कारण फेशियलसाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, आता एक आठवड्यात घरबसल्या तुमच्या चेहऱ्यावर चमक येईल पण त्यासाठी 7 दिवसांचं ब्युटी रुटीन व्यवस्थित फॉलो करावं लागेल.
फेशियलसाठीची सामग्री आणि सात दिवस तुम्ही खाली दिलेल्या टिप्स वापरल्या तर कोरडेपणा जाऊन तुमच्या चेहऱ्याचा पोत सुधारेल.
फेशियलसाठी साहित्य -
1 चमचा मध, 2 चमचे दूध, 1 चिमूट हळद, चंदन पावडर, 1 व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि गोल्डन सीरम
advertisement
पहिला दिवस
पहिल्या दिवशी, चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा, दुधात मध मिसळा आणि 10 मिनिटं चेहऱ्यावर लावा. त्यानंतर फेस वाईप्सनं चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या चेहऱ्याला पूर्ण पोषण मिळेल.
दुसरा दिवस
दुसऱ्या दिवशी दुधात हळद मिसळून स्क्रब तयार करा. यामुळे चेहऱ्यावर साचलेला सर्व मळ निघून जाईल. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर 5 मिनिटं घासा आणि नंतर चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल.
advertisement
तिसरा दिवस
तिसऱ्या दिवशी तुम्ही हळद आणि दुधाचा फेस पॅक तयार करून वीस मिनिटं चेहऱ्यावर लावा. यानंतर चेहरा कोमट पाण्यानं स्वच्छ करा. यामुळे तुमच्या त्वचेला थंडावा मिळेल.
चौथा दिवस
चौथ्या दिवशी, चेहऱ्यावर गोल्ड सीरम लावा आणि त्वचेला हलक्या हातानं मसाज करा. यामुळे त्वचेला ओलावा मिळेल आणि ग्लोही कायम राहील.
advertisement
पाचवा दिवस
चेहऱ्यावर हलकं तेल लावून मसाज करा. यामुळे त्वचेला मॉइश्चरायझेशन मिळेल. त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळाल्यानं चेहरा तजेलदार दिसेल.
सहावा दिवस
व्हिटॅमिन ई कॅप्सूल रात्रभर चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचेला पूर्ण पोषण मिळेल. त्यामुळे त्वचेची कोमलता कायम राहील.
सातवा दिवस
सातव्या दिवशी हळद आणि चंदनाचा पॅक लावा, यामुळे त्वचा मुलायम होईल आणि चेहरा तजेलदार दिसेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 1:13 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Facial : घरीच करा गोल्डन फेशियल, सात दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावर येईल चमक