Vitamin E : कोरड्या, निर्जीव केसांवर रामबाण उपाय, व्हिटॅमिन ईचा मास्क वापरा, केस दिसतील मुलायम, दाट
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केसांच्या समस्या दूर करण्यासाठी काही हेअर मास्क प्रभावी ठरू शकतात. व्हिटॅमिन ईचे हेअर मास्क बनवण्याच्या काही पद्धती नक्की वापरुन बघा. हे मास्क केसांवर व्यवस्थित लावले तर केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई मुळे केस दाट आणि मुलायम होण्यास मदत होते.
मुंबई : केस निर्जीव आणि कोरडे दिसत असतील तर अनेक उपाय केले जातात. तुम्हाला तुमचे केस मऊ आणि दाट दिसावेत असं वाटत असेल तर व्हिटॅमिन ई कॅप्सूल लावणं तुमच्यासाठी उपयुक्त ठरु शकतं. केसांची योग्य काळजी घेतली तर केस जाड आणि मुलायम दिसतात आणि केस वाढण्यासही मदत होते. याउलट केसांची योग्य काळजी घेतली नाही तर केस कोरडे आणि निर्जीव होऊ लागतात आणि केस तुटण्याचं प्रमाणही वाढतं.
केसांच्या या समस्या दूर करण्यासाठी काही हेअर मास्क प्रभावी ठरू शकतात. व्हिटॅमिन ईचे हेअर मास्क बनवण्याच्या काही पद्धती नक्की वापरुन बघा. हे मास्क केसांवर व्यवस्थित लावले तर केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ई मुळे केस दाट आणि मुलायम होण्यास मदत होते.
advertisement
व्हिटॅमिन ई एक अँटी-ऑक्सिडेंट आहे जे केसांसाठीच नाही तर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. टाळूवर होणारं नुकसानही यामुळे कमी होतं. याच्या वापरानं केसगळती कमी होते, केसांना चमक येते, केसांची वाढ होण्यास मदत होते आणि केसांचा पोतही सुधारू लागतो.
advertisement
व्हिटॅमिन ई तेलात मिसळून लावा
व्हिटॅमिन ई इतर कोणत्याही तेलात मिसळून केसांना लावता येतं. खोबरेल तेलात व्हिटॅमिन ई कॅप्सूल
घाला, हे मिश्रण मिसळून केसांना लावा, काही वेळ ठेवा आणि नंतर धुवा. यामुळे केसांची खाज
कमी होते.
व्हिटॅमिन ई आणि दही
advertisement
एक भांडं दह्यात 2 व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून हेअर मास्क बनवता येतो. हा हेअर मास्क अर्धा
तास डोक्यावर ठेवल्यानंतर धुऊन काढता येतो. यामुळे केसांना चमक येते.
advertisement
व्हिटॅमिन ई सीरम केसांवर व्हिटॅमिन ई सीरम लावण्यासाठी, जोजोबा तेल किंवा अर्गन तेल व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये मिसळून लावता येतं. या तेलांमध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल मिसळून ते लावल्यास चांगलं सीरम तयार होतं. हे सीरम किंचित ओल्या केसांवर लावता येतं.
advertisement
व्हिटॅमिन ई आणि कोरफड
व्हिटॅमिन ई कॅप्सूल कोरफड गरामध्ये मिसळून केसांवर लावता येतं. या दोन्ही गोष्टी एकत्र मिसळून
केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावता येतात. काही काळ ठेवल्यानंतर ते धुवून काढता येतं.
व्हिटॅमिन ई आणि मध
advertisement
एका भांड्यात २ चमचे मध, २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल आणि थोडं दही आणि कोरफड एकत्र करून
केसांना लावता येतं. हे मिश्रण केसांना लावल्यानं कोरडेपणा दूर होतो,डोक्यातील कोंडा दूर होतो
आणि टाळूला पुरेशी आर्द्रता मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin E : कोरड्या, निर्जीव केसांवर रामबाण उपाय, व्हिटॅमिन ईचा मास्क वापरा, केस दिसतील मुलायम, दाट


