Peanuts : शेंगदाण्यांना का म्हटलं जातं - गरीबांचा बदाम, आरोग्यासाठी पूरक आणि पौष्टिक खाद्य

Last Updated:

काजू आणि बदामापेक्षा अधिक फायदेशीर असलेला एक स्वस्त पर्याय म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे म्हणजे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा घटक, म्हणूनच शेंगदाण्यांना, "गरीबांसाठीचा बदाम" देखील म्हटलं जातं.

News18
News18
मुंबई : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. काजू, बदाम, पिस्ता आणि अक्रोड यासारखा सुका मेवा खाल्ल्यानं आपल्या शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात, पण सुका मेवा महाग असतो आणि सुका मेवा विकत घेणं प्रत्येकाला परवडेल असं नाही. अशावेळी शेंगदाणे हा महागड्या ड्रायफ्रुट्सला चांगला पर्याय ठरु शकतो. आपल्या रोजच्या आहारात खाऊ म्हणून शेंगदाण्यांचा समावेश नक्की करा.
काजू आणि बदामापेक्षा अधिक फायदेशीर असलेला एक स्वस्त पर्याय म्हणजे शेंगदाणे. शेंगदाणे म्हणजे स्वस्त आणि सहज उपलब्ध होणारा घटक, म्हणूनच शेंगदाण्यांना, "गरीबांसाठीचा बदाम" देखील म्हटलं जातं. हिवाळ्यात शेंगदाण्याचं भरपूर सेवन केलं जातं. पाहूयात, शेंगदाणे खाण्याचे फायदे.
शेंगदाण्यातील पोषक घटक
शेंगदाणे हा प्रथिनं, फायबर, हेल्दी फॅटस् आणि अनेक जीवनसत्त्वं आणि खनिजं यांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यामधले प्रमुख पोषक घटक आणि शरीराला त्यामुळे होणारे फायदे पाहूया.
advertisement
प्रथिनं : स्नायू आणि ऊतींच्या दुरुस्तीसाठी उपयुक्त 
मॅग्नेशियम आणि पोटॅशियम: हाडं मजबूत करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त.
फायबर: पचनव्यवस्थेसाठी आवश्यक घटक, यामुळे पचनसंस्था मजबूत होते.
advertisement
अँटिऑक्सिडंट्स: शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त.
शेंगदाणे, काजू आणि बदामातील फरक समजावून घेऊ
- शेंगदाण्याची किंमत काजू आणि बदामाच्या तुलनेत खूपच कमी आहे.
- प्रथिनांचं भांडार: शेंगदाण्यामध्ये प्रथिनं जास्त असतात,त्यामुळे शाकाहारींसाठी हा एक उत्तम पर्याय आहे.
advertisement
- हेल्दी फॅट्स : शेंगदाण्यांमध्ये असलेले मोनोसॅच्युरेटेड फॅट्स हृदयासाठी फायदेशीर असतात.
- नाश्ता: भूक भागवण्यासाठी आणि ऊर्जा देण्यासाठी हा एक परिपूर्ण पदार्थ आहे.
- भाजलेले शेंगदाणे: चवीला अप्रतिम लागतात आणि बराच काळ ताजे राहतात.
advertisement
- पीनट बटर : पीनट बटर ब्रेड, पोळीवर लावून खाता येतं. मुलांसाठी हा एक चवदार,आरोग्यदायी पदार्थ आहे.
- चटणी : शेंगदाण्याची चटणीतून चांगलं पोषण मिळतं.
- सॅलड : शेंगदाणे सॅलडमध्ये घालूनही खाता येतात.
- लाडू : शेंगदाणे आणि गूळ घालून बनवलेले लाडूही शरीरासाठी पौष्टिक आणि स्वादिष्ट असतात.
advertisement
शेंगदाणे कितीही आवडत असले तरी या गोष्टी लक्षात ठेवा:
advertisement
- शेंगदाणे मर्यादित प्रमाणात खा, कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.
- जर तुम्हाला शेंगदाण्यापासून ऍलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका.
- भाजलेल्या शेंगदाण्यांमध्ये अतिरिक्त मीठ घालू नका, कारण जास्त मीठ आरोग्यासाठी
हानिकारक ठरु शकतं.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Peanuts : शेंगदाण्यांना का म्हटलं जातं - गरीबांचा बदाम, आरोग्यासाठी पूरक आणि पौष्टिक खाद्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement