Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा, तब्येत राहील ठणठणीत

Last Updated:

Reduce Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचतं, रक्तप्रवाहात अडथळा आणतं आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. यामुळे हृदयविकाराचा त्रासही वाढतो.

Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा, तब्येत राहील ठणठणीत
Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा, तब्येत राहील ठणठणीत
मुंबई: हाय कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवतात. यासाठी लसूण खाल्ल्यानं हाय कोलेस्ट्रॉलची समस्या दूर होऊ शकते. आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. आजकाल तेल आणि भरपूर मसाले असलेलं अन्न खाल्लं जातं‌, त्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढतं. त्याचा थेट परिणाम तब्येतीवर होतो. कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये साचतं, रक्तप्रवाहात अडथळा आणतं आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. यामुळे हृदयविकाराचा त्रासही वाढतो.
लसूण खाल्ल्यानं उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या कशी दूर होते आणि कोणते पदार्थ खाल्ले तर कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं याविषयी जाणून घेऊया.
लसूण शीरांमध्ये जमा झालेलं वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहे. लसणात प्रतिजैविकं असतात. त्यात मॅग्नेशियम, सेलेनियम आणि झिंक सारखी खनिजं देखील आढळतात आणि सेवन केल्यावर शरीराला अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मिळतात.
advertisement
कच्चा लसूण दिवसातून एकदा खाऊ शकतो. तुम्ही लसूण पाण्यात टाकूनही पिऊ शकता. तसंच‌ स्वयंपाकातही भाज्या आणि सूप, चटण्यांमध्येही लसणाचा वापर करा.

हे पदार्थ कोलेस्ट्रॉलही कमी करतात

लसणाव्यतिरिक्तही असे अनेक खाद्य पदार्थ आहेत जे हाय कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. उच्च कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी भोपळ्याच्या बिया हादेखील चांगला पर्याय आहे.
advertisement
  1. भोपळ्याच्या बिया: भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम आणि हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होतात, रक्ताभिसरण सुधारतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होण्यापासून रोखण्यात मदत होते.
  2. जवस: कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी जवस देखील प्रभावी आहे. जवसामध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट असल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. यामुळे पचनक्रियाही सुधारते.
  3. अंडी: अंड्यांमध्ये चांगलं कोलेस्ट्रॉल असते, त्यामुळे अंडी खाल्ल्यानं चांगलं कोलेस्ट्रॉल वाढण्यासाठी मदत होते आणि वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ लागतं.
  4. सोयाबीन: सोयाबीनच्या सेवनानं वाईट कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकतं. सोयाबीन खाल्ल्यानं आरोग्यास लाभ होतो आणि हृदयाचं आरोग्यही सुधारतं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Bad Cholesterol: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी हे उपाय नक्की करा, तब्येत राहील ठणठणीत
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement