Cholesterol Symptoms: हाता-पायांवर दिसतात कोलेस्ट्रॉलची ही लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Cholesterol Symptoms in Marathi: उच्च कोलेस्टेरॉल असणे म्हणजे तुमच्या रक्तातील 'खराब' कोलेस्टेरॉल खूप वाढले आहे. ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते.
मुंबई : हल्ली बहुतांश लोक उच्च कोलेस्ट्रॉलने ग्रस्त आहेत. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त असणे खूप हानिकारक असू शकते. उच्च कोलेस्टेरॉल असणे म्हणजे तुमच्या रक्तातील 'खराब' कोलेस्टेरॉल खूप वाढले आहे. ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदयविकार होण्याची शक्यता वाढते. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आणि व्यायाम न केल्यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या सामान्य होत आहे. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात होऊ शकतो. म्हणूनच याची लक्षणं ओळखून वेळीच उपचार करायला हवे.
express.co.uk मध्ये प्रकाशित झालेल्या एका बातमीनुसार, प्रत्येकाने आपल्या कोलेस्टेरॉलच्या पातळीचे नियमित निरीक्षण केले पाहिजे. जेणेकरुन हृदयविकाराची समस्या आणि रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेजची वेळीच ओळख होऊ शकेल. कोलेस्टेरॉलची अनेक लक्षणे आणि धोक्याची चिन्हे तुमच्या शरीरावरही दिसतात. यातील काही लक्षणे हातावरही दिसतात. उच्च कोलेस्टेरॉलची ही लक्षणे तुमच्या हातावरही दिसत असतील, तर ताबडतोब कोलेस्टेरॉलची तपासणी करून घ्या.
advertisement
हात दुखणे..
हे उच्च कोलेस्टेरॉलचे लक्षण आहे. जेव्हा तुमच्या धमन्यांमध्ये प्लेक जमा होतो, तेव्हा ते रक्तवाहिन्यांना ब्लॉक करते, ज्याला एथेरोस्क्लेरोसिस म्हणतात. ही एक गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल शरीरात जास्त प्रमाणात जमा होत असल्याने हातातील रक्तवाहिन्याही बंद होऊ शकतात. याची काळजी न घेतल्यास कोलेस्टेरॉल सतत वाढू शकते. त्यामुळे हात दुखतात. तुम्हालाही वारंवार हात दुखत असतील तर एकदा तुमचे कोलेस्ट्रॉल तपासा.
advertisement
हाताला मुंग्या येणे..
वारंवार मुंग्या येणे आणि हात सुन्न होणे हे चांगले लक्षण नाही. हे उच्च कोलेस्टेरॉलचे संभाव्य लक्षण असू शकते. शरीराच्या एखाद्या भागामध्ये रक्तप्रवाहात अडथळा निर्माण झाला की हाताला मुंग्या येणे जाणवू लागते. जे लोक खूप मद्यपान करतात किंवा टाईप 2 डायबिटीज आहेत त्यांच्या हाताला आणि पायांना मुंग्या येतात. असे होत असेल तर एकदा डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
नखांच्या रंगात बदल..
तुमच्या नखांचा रंग जांभळा किंवा गुलाबी दिसत असेल तर हेदेखील उच्च कोलेस्ट्रॉल दाखवते. हातामध्ये योग्य रक्तपुरवठा न झाल्यामुळे असे होऊ शकते. नखांमध्ये असे काही बदल दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच उच्च कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी निरोगी आहार घ्या, रोज व्यायाम करा, सक्रिय राहण्याचा प्रयत्न करा, जीवनशैली सुधारा, जास्त चरबीयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ इत्यादी खाऊ नका.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 17, 2024 1:16 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol Symptoms: हाता-पायांवर दिसतात कोलेस्ट्रॉलची ही लक्षणं, अजिबात करू नका दुर्लक्ष..


