कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘हे’ एक फळ पुरेसे! जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
अक्रोड हा पोषक तत्त्वांनी भरलेला सुकामेवा आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी, हृदयविकार टाळण्यासाठी, वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी अक्रोड उपयुक्त आहे.
भाजी-भाकरी किंवा डाळ-भात यांसारखे संतुलित घरगुती जेवण खाल्ल्याने आपल्या शरीराची दैनंदिन पौष्टिक तत्त्वांची गरज बऱ्याच अंशी पूर्ण होते. पण यानंतरही आपल्या शरीराला अनेक पोषक तत्त्वांची गरज असते. अशा स्थितीत, सुक्या मेव्याचे सेवन आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरते. कोलेस्ट्रॉल ही एक समस्या आहे ज्यामुळे अनेक लोक लठ्ठपणा आणि हृदयविकार यांसारख्या समस्यांशी झुंजत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, एक असा सुका मेवा आहे जो तुमच्या शरीरात जमा झालेले हे कोलेस्ट्रॉल काढू शकतो. अक्रोड हे एक ‘सुपरफूड’ आहे, ज्यामध्ये आरोग्याचा खजिना लपलेला आहे. नियमितपणे अक्रोडचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित करता येते. आयुर्वेदाचार्य आचार्य बालकृष्ण यांनी शरीरासाठी अक्रोडचे अनेक फायदे सांगितले आहेत...
अक्रोडचे आरोग्यदायी फायदे
आचार्य बालकृष्ण यांच्या मते, अक्रोडचे सेवन केवळ कोलेस्ट्रॉलची कमी करत नाही, तर ते पोटाच्या समस्यांमध्येही मदत करते. यासोबतच अक्रोड वजन कमी करण्यासही मदत करते. अक्रोड खाल्ल्याने गुडघेदुखीपासूनही आराम मिळतो. या सुक्या मेव्याचे फायदे जाणून घ्या....
प्रथिने (Protein) : अक्रोडमध्ये चांगल्या प्रमाणात प्रथिने असतात, जे स्नायू तयार करण्यासाठी आणि दुरुस्त करण्यासाठी आवश्यक आहेत.
advertisement
फॅटी ॲसिड (ओमेगा-3 फॅटी ॲसिड) : अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड (अल्फा-लिनोलेनिक ॲसिड) असतात, जे हृदयाचे आरोग्य राखण्यास, जळजळ कमी करण्यास आणि मेंदूच्या विकासात मदत करतात.
फायबर : अक्रोडमध्ये चांगल्या प्रमाणात फायबरही असते, जे पचनक्रिया निरोगी ठेवण्यास आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन्स : व्हिटॅमिन ई मध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. त्याच वेळी, व्हिटॅमिन बी6 मानसिक आरोग्य, ऊर्जा पातळीसाठी खूप महत्वाचे आहे.
advertisement
खनिजे (Minerals) : तुम्हाला या सुक्या मेव्यात मॅग्नेशियम, झिंक आणि कॉपरसारखे घटकही मिळतात.
अक्रोड खाण्याचे आरोग्य फायदे
हृदयाचे आरोग्य (Heart Health) : ओमेगा-3 फॅटी ॲसिडमुळे अक्रोड हृदयविकाराचा धोका कमी करतात. ते धमन्यांमध्ये ‘प्लाक’ तयार होण्यास प्रतिबंध करतात, जे हृदयविकाराचे मुख्य कारण आहे. अक्रोडमध्ये पॉलीअनसॅचुरेटेड फॅटी ॲसिड आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यास मदत करतात.
advertisement
मानसिक आरोग्य (Mental Health) : अक्रोडच्या सेवनाने मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि अल्झायमरसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो.
वजन नियंत्रण (Weight Control) : अक्रोडमध्ये फायबर आणि प्रथिने असतात, जे भूक नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करू शकतात. जास्त वेळ पोट भरलेले राहिल्याने तुम्हाला वारंवार खाण्याची सवय लागत नाही आणि तुमचे वजन नियंत्रणात राहते.
advertisement
पचन सुधारते (Improves Digestion) : फायबरच्या उपस्थितीमुळे पचनक्रिया सुरळीत होते आणि बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर (Beneficial for Skin and Hair) : व्हिटॅमिन ई आणि इतर पोषक तत्वे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात.
हे ही वाचा : Facial : घरीच करा गोल्डन फेशियल, सात दिवसांचं ब्युटी रुटीन फॉलो करा, चेहऱ्यावर येईल चमक
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 13, 2025 4:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी ‘हे’ एक फळ पुरेसे! जाणून घ्या याचे आश्चर्यकारक फायदे