Radish Health Benefits: हिवाळ्यात ही भाजी आवर्जून खा, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
Health Benefits of Radish in marathi: वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये झपाट्यानं वाढ होण्याची समस्या हल्ली वेगानं वाढते आहे. ही मुख्यत: जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी, आहारात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.
मुंबई : हिवाळ्यात हिरव्या भाज्या जरुर खाव्यात कारण यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यात मदत होईल तसंच तुमच्या आहारात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचाही समावेश करा. यामुळे उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल या दोन्हींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
वाईट कोलेस्ट्रॉलमध्ये झपाट्यानं वाढ होण्याची समस्या हल्ली वेगानं वाढते आहे. ही मुख्यत: जीवनशैलीशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी, आहारात अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्व असलेल्या पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे.
advertisement
कारण यामुळे उच्च रक्तदाब आणि खराब कोलेस्ट्रॉल या दोन्हींवर नियंत्रण ठेवणं शक्य होतं. मुळा या भाजीमध्ये अँटिऑक्सिडेंट, पोटॅशियम, फायबर आणि अँथोसायनिन हे घटक देखील असतात. ही सर्व पोषक तत्व शरीरातून कोलेस्टेरॉल बाहेर फेकण्यासाठी मदत करतात. तसंच मुळ्यामध्ये असलेलं पाणी शिरांमध्ये अडकलेलं खराब कोलेस्ट्रॉल मल आणि लघवीच्या मदतीनं सहज बाहेर काढण्यासाठी उपयुक्त आहे.
advertisement
मुळा खाण्याचे इतर फायदेही पाहूया (Radish Health Benefits in Marathi)
- धमन्या निरोगी ठेवण्यासाठी मुळा खूप उपयुक्त आहे.
- शरीराला डिटॉक्स करण्यासाठी हा उत्कृष्ट घटक आहे.
- मुळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) खूप कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
- मुळ्यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.
- मुळ्यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात, त्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते, कारण भूक नियंत्रित करणं आणि शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी याचा उपयोग होतो.
- मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स आणि पाणी चांगल्या प्रमाणात असतं, ज्यामुळे त्वचा हायड्रेट आणि चमकदार ठेवण्यास मदत होते.
- हे अँटीएजिंग फूड म्हणून देखील चांगलं कार्य करतं.
- मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चांगल्या प्रमाणात असतं, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतं आणि संसर्गापासून संरक्षण करतं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 22, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Radish Health Benefits: हिवाळ्यात ही भाजी आवर्जून खा, कॉलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी उपयुक्त