Say No to Sugar : वजन कमी करण्यासाठी पथ्य पाळा, हे पदार्थ खाणं टाळा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
मैदा, साखर, तांदूळ, ब्रेड हे पदार्थ खाणं टाळलंत तर तुमचं वजन वेगानं कमी होईल. आहारात हे बदल करणं आरोग्यासाठी उपयुक्त ठरेल.
मुंबई : कितीही प्रयत्न केले तरी वजन कमी होत नसेल आणि सगळे उपाय करुन झाले असतील तर आजपासूनच आहारातून काही गोष्टी वगळ्याची तुम्हाला गरज आहे. हे उपाय केलेत तर लठ्ठपणा झपाट्यानं कमी होण्यास सुरुवात होईल. त्यासाठी मैदा, साखर, ब्रेड आणि भात या पांढऱ्या पदार्थांचं सेवन आधी कमी आणि नंतर बंद करावं लागेल.
लठ्ठपणा ही आजच्या काळातील एक मोठी समस्या आहे. वजन कमी करण्यासाठी सर्व डाएट आणि व्यायाम करून थकला असाल, पण वजन कमी होत नसेल, तर तुमच्या आहारातून काही गोष्टी वगळून वजन लवकर कमी करू शकता. कारण आपल्यापैकी बहुतेकजण हे पदार्थ खातो पण ते खाल्ल्यानं वजन कमी होईल याचा विचार केला जात नाही म्हणून ही माहिती महत्त्वाची..
advertisement
1. भात -
भात हा भारतीय खाद्यपदार्थांतला महत्त्वाचा भाग आहे. डाळ आणि भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटतं. तुम्हीही भात खाण्याचे शौकीन असाल आणि वजन कमी करायचं असेल तर आजपासूनच भात खाणं बंद करा. अन्यथा वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं.
advertisement
२. साखर -
अनेकांच्या आहारात सकाळपासून रात्रीपर्यंत साखर वापरली जाते. पण साखरेमध्ये भरपूर कॅलरीज असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. त्यामुळे गोड खाण्याची आवड असेल तर ती बंद करावी लागेल कारण साखरेमुळे वजन वाढतं.
advertisement
3. पांढरा ब्रेड -
ब्रेड हा अनेकदा नाश्त्यात खाल्ला जाणारा पदार्थ आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडतो. पण ब्रेडमुळे वजन वाढतं. त्यामुळे वजन कमी करायचं असेल तर चुकूनही व्हाईट ब्रेड खाऊ नका.
4. मैदा -
आपल्याकडे मैदा वापरुन बनवलेले अनेक पदार्थ असतात. पण यामुळे वजन तर वाढतंच आणि आरोग्यासाठीही मैदा हानिकारक मानला जातो. तुम्हालाही वजन कमी करायचं असेल, तर तुमच्या आहारातून मैद्याला बाय बाय करा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 8:14 PM IST








