Hair Care Oil : केसांवर रासायनिक उत्पादनं वापरणं टाळा, हे घरगुती तेल वापरुन जपा केसांचं आरोग्य
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस काळे, लांब, दाट असावेत यासाठी अनेक उपाय आहेत. पण यासाठी तेल हा रामबाण उपाय आहे. घरीच तुम्ही हेअर केअर ऑईल बनवू शकता. आवळा, मेथीचे दाणे, कढीपत्याचा वापर करुन तेल बनवता येईल.
मुंबई : काळे, लांब, दाट केस असावेत यासाठी अनेक उपाय आहेत. पण यासाठी तेल हा रामबाण उपाय आहे. घरीच तुम्ही हेअर केअर ऑईल बनवू शकता. आवळा, मेथीचे दाणे, कढीपत्याचा वापर करुन तेल बनवता येईल. प्रदूषण, ताण, खाण्याच्या चुकीच्या सवयी आणि रासायनिक पदार्थांचा वापर यामुळे केसांचं आरोग्य बिघडतं. केसांच्या समस्येनं तुम्ही त्रस्त असाल तर घरगुती उपायांची तुम्हाला मदत होऊ शकेल.
या तेलामुळे केसांना पोषण मिळेलच शिवाय केस काळे, लांब आणि चमकदार राहतील. तुम्ही हे घरी सहज बनवू शकता. पाहूया यातले काही पर्याय
आवळा तेल
आवळा केसांसाठी वरदान आहे. हे केसांच्या वाढीसाठी आणि केस दाट होण्यासाठी उपयुक्त ठरेल. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे केस मजबूत होतात.
advertisement
तेल तयार करण्याची पद्धत -
2-3 ताजे आवळे घ्या आणि त्यांचे लहान तुकडे करा. खोबरेल तेलात टाकून मंद आचेवर गरम करा. तेलाचा रंग हलका तपकिरी झाला की गॅस बंद करुन थंड होऊ द्या. तेल गाळून स्वच्छ बाटलीत साठवा. आठवड्यातून 2-3 वेळा या तेलानं केसांना मसाज करा.
2. मेथी आणि मोहरीचं तेल
advertisement
मेथीच्या दाण्यामध्ये प्रोटीन आणि लोह असतं, ज्यामुळे केस गळणं थांबतं. मोहरीचं तेल केसांना मुळांपासून मजबूत करतं आणि यामुळे केसांची नैसर्गिक चमक वाढते.
तयार करण्याची पद्धत
एक चमचा मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट बनवा. १ कप मोहरीचे तेल गरम करून त्यात मेथीची पेस्ट घाला. तेल थंड करून गाळून घ्या. आठवड्यातून दोनदा याचा वापर करा.
advertisement
3. कढीपत्ता आणि खोबरेल तेल
कढीपत्त्यात असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं केस पांढरे होण्याचं प्रमाण कमी करतात. या तेलामुळे केस काळे, जाड आणि चमकदार होतात.
तयार करण्याची पद्धत-
कढीपत्त्याची 10-12 पानं उन्हात वाळवा. ही पानं १ कप खोबरेल तेलात टाकून मंद आचेवर गरम करा.
advertisement
तेलाचा रंग बदलू लागेल आणि त्यात कढीपत्त्याचा सुगंध येऊ लागेल. ते गाळून ठेवा, या तेलाचा नियमित वापर करा.
वापरण्याची पद्धत -
हे तेल हलकं गरम करून टाळूवर आणि केसांच्या मुळांना लावा. हलक्या हातांनी मसाज करा जेणेकरून तेल केसांच्या मुळांपर्यंत पोहोचेल. कमीत कमी २-३ तास किंवा रात्रभर केसांवर तेल राहू दे. सौम्य शैम्पूनं केस धुवा.
advertisement
यामुळे केस गळणं कमी होतं. पांढऱ्या केसांची समस्या दूर होते. केसांना नैसर्गिक चमक मिळते. डोक्यातील कोंडा आणि टाळूशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. या घरगुती तेलांचा नियमित वापर केल्यानं तुमचे केस मजबूत तर होतीलच, शिवाय रासायनिक उत्पादनांपासूनही तुमचा बचाव होईल. या टिप्स वापरून पहा आणि केसांचं आरोग्य जपा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 5:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care Oil : केसांवर रासायनिक उत्पादनं वापरणं टाळा, हे घरगुती तेल वापरुन जपा केसांचं आरोग्य









