advertisement

Pune: एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर कोयत्याने वार, हल्लेखोराचाही भयंकर अंत, जुन्नरमधील घटनेला नवं वळण

Last Updated:

Pune Junnar News: पुण्यातील जुन्नर तालुक्यात एका कॉलेजच्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. आता या घटनेला नवं वळण मिळालं असून हल्लेखोर देखील मृत आढळला आहे.

junnar one side love case
junnar one side love case
सचिन तोडकर, प्रतिनिधी जुन्नर: पुण्यातील जुन्नर तालुक्यात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. बुधवारी इथं एका कॉलेजच्या तरुणीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर कोयत्याने वार केले होते. हा हल्ला केल्यानंतर तरुण फरार झाला होता. मात्र आता अखेर हल्ला करणारा हा तरुण मृत आढळून आला आहे. जुन्नर परिसरातील एका टेकडीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह सापडला आहे. हल्लेखोराचा अशाप्रकारे मृतदेह आढळल्याने विविध चर्चांना उधाण आलं आहे.

नेमकी घटना काय?

महेश डामसे असं मृत आढळलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याचं त्याच्याच गावातील एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होतं. त्याने तिच्याकडे लग्नासाठी विचारणा केली होती. परंतु तरुणीने लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. या नकाराचा राग महेशच्या मनात धुमसत होता. याच रागातून त्याने तरुणीवर हल्ला करण्याचा कट रचला.
बुधवारी सकाळी ही तरुणी जुन्नरमधील आदिवासी मुलींच्या शासकीय वस्तीगृहातून महाविद्यालयाकडे जाण्यासाठी निघाली होती. वस्तीगृहाच्या बाहेरच दबा धरून बसलेल्या महेशने तिला गाठले आणि काही कळण्याच्या आत आपल्याजवळील तीक्ष्ण कोयत्याने तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर सपासप वार केले. या भीषण हल्ल्यात तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि गंभीर जखमी झाली.
advertisement

गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह

हल्ला केल्यानंतर महेश घटनास्थळावरून फरार झाला होता. जुन्नर पोलिसांनी तातडीने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, आज सकाळी एका टेकडीवर महेशची दुचाकी पोलिसांना आढळून आली. परिसराची अधिक पाहणी केली असता, जवळच असलेल्या एका झाडाला महेशने गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला. हल्ल्यानंतर अटकेच्या भीतीने किंवा पश्चातापातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement

एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट

एकतर्फी प्रेमातून घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे जुन्नर तालुका हादरून गेला आहे. गंभीर जखमी तरुणीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. भरदिवसा तरुणीवर झालेल्या या हल्ल्यामुळे आणि त्यानंतर आरोपीचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune: एकतर्फी प्रेमातून कॉलेज तरुणीवर कोयत्याने वार, हल्लेखोराचाही भयंकर अंत, जुन्नरमधील घटनेला नवं वळण
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement