Diet for vision : चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर आहारात करा बदल, डोळ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी होईल मदत
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. दृष्टी सुधारण्यासाठी, भरपूर पोषण असलेल्या, आणि डोळे निरोगी ठेवण्यास आवश्यक असलेल्या पदार्थांचं सेवन करणं आवश्यक आहे.
मुंबई : चष्मा घालवण्यासाठी, चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी किंवा दृष्टी चांगली राहावी यासाठी काही पदार्थ आवर्जून खाणं आवश्यक आहे. कारण या खाद्यपदार्थांमुळे चष्मा घालवण्यासाठी, कमी करण्यासाठी आणि दृष्टीची गुणवत्ता वाढवण्यास मदत होऊ शकते.
दृष्टी सुधारण्यासाठी, भरपूर पोषण असलेल्या, आणि डोळे निरोगी ठेवण्यास आवश्यक असलेल्या पदार्थांचं सेवन करणं आवश्यक आहे. डोळे हे आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहेत, त्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या स्क्रिनमुळे डोळ्यांवर परिणाम होतात. तंदुरुस्तीसाठी व्यायाम आणि संतुलित आहाराचा समावेश करतात परंतु त्यांच्या डोळ्यांच्या काळजीकडे कमी लक्ष देतात. त्यामुळे आपली दृष्टी क्षीण होऊ लागते.
advertisement
दृष्टी सुधारण्यासाठी, आपल्याला अशा पदार्थांचं सेवन करणं आवश्यक आहे जे आपली दृष्टी सुधारण्यास मदत करतात. आपण आपल्या आहारात कोणते पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत ते जाणून घेऊया.
व्हिटॅमिन ए
दृष्टी सुधारण्यासाठी, आहारात अशा गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे ज्यात व्हिटॅमिन ए भरपूर आहे. व्हिटॅमिन एला दृष्टीसाठीचं जीवनसत्व म्हणजेच 'व्हिजन व्हिटॅमिन' असंही म्हणतात. या जीवनसत्वासाठी तुमच्या आहारात आंबा, पपई, गाजर, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
advertisement
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई आपल्या डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठीदेखील मदत करते. व्हिटॅमिन ई हे अँटी-ऑक्सिडंट म्हणूनही काम करते. ज्यामुळे वाढत्या वयासोबत डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते. म्हणूनच, आहारात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असण्यावर भर द्या. बदाम, शेंगदाणे, पालक, भोपळा, शिमला मिरची आणि आंबा यामध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते.
advertisement
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी देखील दृष्टी सुधारण्यास मदत करू शकते. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध अन्नपदार्थांचा समावेश करू शकता. हिरवी शिमला मिरची, ब्रोकोली, टोमॅटो सूप, फ्लॉवर, कोबी आणि आवळा यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं.
advertisement
जस्त
झिंक म्हणजे जस्ताच्या सेवनानं आपली दृष्टी सुधारण्यासही मदत होते. यासोबतच जस्त आपल्या शरीराला इतर आरोग्यदायी फायदे प्रदान करण्यातही मदत करतं. आपल्या डोळ्यांमध्ये मेलेनिन तयार करण्यासाठी यकृतापासून रेटिनापर्यंत म्हणजेच डोळ्याच्या पडद्यापर्यंत व्हिटॅमिन ए वितरीत करण्यासाठी जस्ताचा उपयोग होतो. ओट्स, चणे, दही, कॉर्न फ्लेक्स, भोपळ्याच्या बिया, चिकन ब्रेस्ट, लाल मांस, डुकराचं मांस यामध्ये जस्ताचं प्रमाण चांगलं असतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 20, 2025 12:15 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diet for vision : चष्म्याचा नंबर कमी करायचा असेल तर आहारात करा बदल, डोळ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी होईल मदत