Bad Breathe : जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे जाणवते श्वासाची दुर्गंधी, लगेचच करा उपाय

Last Updated:

व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे श्वासाची दुर्गंधी जाणवते. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर त्याचा शरीराच्या ऊर्जा पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. तसंच,  हे जीवनसत्व रक्त निर्मिती, मज्जासंस्थेचं आरोग्य आणि शरीराच्या विविध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.

News18
News18
मुंबई : बोलताना किंवा वावरताना तोंडातून वास येत असेल तर आत्मविश्वासावरही परिणाम होतो. काही जुजबी उपाय केल्यानंतरही तुम्हाला श्वासाची दुर्गंधी जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. कारण तोंडाच्या स्वच्छतेबाबत निष्काळजीपणामुळे श्वासाची दुर्गंधी येऊ शकते. याशिवाय व्हिटॅमिनची कमतरता हे देखील श्वासाच्या दुर्गंधीचं कारण असू शकतं.
व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे श्वासाची दुर्गंधी जाणवते. व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर त्याचा शरीराच्या ऊर्जा पातळीवर परिणाम होतो, ज्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवतो. तसंच,  हे जीवनसत्व रक्त निर्मिती, मज्जासंस्थेचं आरोग्य आणि शरीराच्या विविध कार्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतं.
advertisement
व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेमध्ये समस्या उद्भवू शकतात, जसं की हात आणि पायाला मुंग्या येणं किंवा हात पाय सुन्न होणं. याशिवाय व्हिटॅमिन बी-12 च्या कमतरतेमुळे ॲनिमिया देखील होऊ शकतो, ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता आणि थकवा जाणवतो. त्याची कमतरता मानसिक आरोग्यावर देखील परिणाम करू शकते, जसे की नैराश्य, गोंधळ आणि चिंता असे त्रास जाणवतात.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेवर मात कशी कराल ?
बीफ, चिकन आणि टर्की खाल्ल्यानं व्हिटॅमिन बी-12 मिळू शकतं.
सॅल्मन, ट्राउट, ट्यूना आणि सार्डिनसारखे मासे हे व्हिटॅमिन बी-12 चे चांगले स्त्रोत आहेत.
अंड्याचा पांढरा भाग व्हिटॅमिन बी-12 चा चांगला स्रोत आहे.
advertisement
दूध, दही आणि चीजमध्ये व्हिटॅमिन बी-12 चांगल्या प्रमाणात असतं.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता काही धान्य आणि वनस्पती-आधारित दूध (जसे की सोया, बदाम किंवा ओट मिल्क) खाऊन देखील भरून काढता येते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Bad Breathe : जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे जाणवते श्वासाची दुर्गंधी, लगेचच करा उपाय
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement