Chapped Lips : फुटलेल्या ओठांसाठी उपयुक्त ठरेल टॉमेटोचा रस, मध, लिंबाचाही करा वापर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हिवाळ्यात,ओठ कोरडे होतात, फुटतात. यासाठी साय, तूप तर लावता येतच शिवाय टॉमेटोचा रसही उपयुक्त आहे.
मुंबई : हिवाळ्यात त्वचेसंदर्भात अनेक समस्या जाणवतात, त्वचेवर तडे जातात, त्यातलाच एक भाग म्हणजे ओठ. हिवाळ्यात,ओठ कोरडे होतात, फुटतात. यासाठी साय, तूप तर लावता येतच शिवाय टॉमेटोचा रसही उपयुक्त आहे.
टोमॅटो वापरुन कोरडे ओठ गुलाबी होतील कारण टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं, ज्यामुळे त्वचा मॉइश्चरायझ होते. ओठांचा रंग सुधारण्यास मदत होते. या ऋतूमध्ये त्वचा कोरडी आणि निर्जीव होते. यामुळे केवळ तुमचा चेहराच नाही तर तुमचे ओठही कोरडे होतात आणि त्यावर भेगा दिसतात. ओठ गुलाबी आणि मुलायम बनवण्यासाठी टोमॅटो हा सर्वोत्तम नैसर्गिक उपाय आहे.
advertisement
टोमॅटोचा रस
सर्व प्रथम, एक ताजा टोमॅटो कापून त्याचा रस काढा. आता बोटांनं हळू हळू ओठांवर लावा. यासाठी कापूस देखील वापरता येईल. पंधरा - वीस मिनिटांनी कोमट पाण्यानं हा रस धुवा.
टोमॅटो आणि मध मिश्रण
एक छोटा टोमॅटो घ्या. त्याचे दोन भाग करा आणि एका लहान भांड्यात लगदा काढा. आता त्यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. आता ते ओठांवर लावा आणि 10 ते 15 मिनिटं राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं धुवा. तुमचे ओठ मऊ आणि तजेलदार दिसतील.
advertisement
टोमॅटो आणि मध मिश्रण
या मिश्रणासाठी एक छोटा टोमॅटो घ्या. त्याचे दोन भाग करा आणि एका लहान भांड्यात लगदा काढा. आता त्यात एक चमचा मध मिसळून पेस्ट तयार करा. आता ते ओठांवर लावा आणि 10 ते 15 मिनिटं राहू द्या. नंतर कोमट पाण्यानं धुवा.
टोमॅटो आणि लिंबू
advertisement
एक टोमॅटो कुस्करा, त्यात लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर हा पॅक ओठांवर लावा आणि 15 ते 20 मिनिटं राहू द्या. नंतर ओठ स्वच्छ करा. काही वेळाने ओठ मऊ आणि गुलाबी दिसू लागतील.
इतर उपाय
तुमचे ओठ फुटू नयेत आणि कोरडे होऊ नयेत यासाठी ओठांवर दररोज लिप बाम अवश्य लावा.
भरपूर पाणी प्या, यामुळे त्वचा आतून हायड्रेट राहण्यास मदत होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 18, 2025 6:24 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Chapped Lips : फुटलेल्या ओठांसाठी उपयुक्त ठरेल टॉमेटोचा रस, मध, लिंबाचाही करा वापर