Vitamin K : हाडं आणि रक्तासाठी आवश्यक व्हिटॅमिन के, पालक, अंडी खाण्यावर द्या भर
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध जीवनसत्वं, खनिजांची आवश्यकता असते. शरीरात 'व्हिटॅमिन के'ची कमतरता असेल तर रक्तस्त्राव आणि हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणूनच 'व्हिटॅमिन के' शरीरासाठी खूप महत्वाचं आहे.
मुंबई : आपल्या शरीराच्या चांगल्या आरोग्यासाठी विविध जीवनसत्वं, खनिजांची आवश्यकता असते. शरीरात 'व्हिटॅमिन के'ची कमतरता असेल तर रक्तस्त्राव आणि हाडांशी संबंधित आजार होऊ शकतात. म्हणूनच 'व्हिटॅमिन के' शरीरासाठी खूप महत्वाचं आहे.
व्हिटॅमिन के शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे, शरीरातल्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये हे जीवनसत्व महत्त्वाचं आहे. रक्त गोठण्यासाठी आणि हाडांच्या मजबुतीसाठी हे जीवनसत्व आवश्यक आहे.
रक्त गोठण्यासाठी उपयुक्त : रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत व्हिटॅमिन के मुख्य भूमिका बजावते. दुखापतीमुळे किंवा कापल्यामुळे जास्त रक्तस्त्राव होऊ नये यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचं आहे.
advertisement
हाडांच्या मजबुतीसाठी आवश्यक : 'व्हिटॅमिन के' हाडांमध्ये कॅल्शियम जमा करण्यास मदत करते, ज्यामुळे हाडं मजबूत आणि निरोगी राहतात.
हृदयाचं आरोग्य सुधारतं: हे जीवनसत्व धमन्यांमध्ये कॅल्शियम जमा होण्यास प्रतिबंध करते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
advertisement
मेंदू आणि त्वचेसाठी फायदेशीर: 'व्हिटॅमिन के' मुळे मेंदूचे न्यूरॉन्स निरोगी राहतात आणि त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करण्यातही हे जीवनसत्व उपयुक्त आहे.
'व्हिटॅमिन के'च्या कमतरतेची लक्षणं
दुखापतीतून प्रदीर्घ काळ रक्तस्त्राव होणं
नाक किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होणं
हाडांमध्ये वेदना किंवा अशक्तपणा जाणवणं
शरीरावर दुखापतीच्या खुणा अचानक दिसणं
advertisement
'व्हिटॅमिन के'च्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे पदार्थ नक्की खा
पालक : पालक हा 'व्हिटॅमिन के'चा उत्तम स्रोत आहे. भाजी, सॅलड, किंवा सूपच्या स्वरुपात पालक खाता येईल.
ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये 'व्हिटॅमिन के' आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असतं. ब्रोकोली उकळवून किंवा हलकं वाफवून खा.
हिरव्या पालेभाज्या: हिरव्या भाज्या आणि कोबी या भाज्या देखील 'व्हिटॅमिन के'चे चांगले स्रोत आहेत.
advertisement
सोया उत्पादनं: टोफू आणि सोया मिल्कमध्ये व्हिटॅमिन के भरपूर प्रमाणात असतं आणि हाडं मजबूत होण्यासाठी याची मदत होते.
अंड्यातील पिवळ बलक: अंड्यातील पिवळ बलक हे इतर पोषक तत्वांसह व्हिटॅमिन के चा चांगला स्रोत आहे. तुमच्या खाण्यामध्ये याचा समावेश करा.
ही बाब लक्षात ठेवा :
तुम्ही रक्त पातळ करणारी औषधं घेत असाल, तर व्हिटॅमिन K घेण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 21, 2025 6:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin K : हाडं आणि रक्तासाठी आवश्यक व्हिटॅमिन के, पालक, अंडी खाण्यावर द्या भर