Cholesterol Control Tips: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी टिप्स...5 भाज्या ठरू शकतात रामबाण उपाय...

Last Updated:

Cholesterol Control Tips in Marathi: कोलेस्ट्रॉल वाढल्यानं रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. जीवनशैलीत काही बदल करून आणि संतुलित आहार करुन कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. विशेषत: काही भाज्या यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.

Cholesterol Control Tips: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी टिप्स...5 भाज्या ठरू शकतात रामबाण उपाय...
Cholesterol Control Tips: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी टिप्स...5 भाज्या ठरू शकतात रामबाण उपाय...
मुंबई: कोलेस्ट्रॉल वाढल्यानं रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो. हा धोका लक्षात घेत, आपण आपल्या आहारातून कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवू शकतो. सध्याच्या काळात कोलेस्ट्रॉल ही गंभीर आरोग्य समस्या घरोघरी दिसते. वाढलेल्या कोलेस्ट्रॉलमुळे केवळ हृदयविकारच नाही तर स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारही होऊ शकतात. पण, आपल्या जीवनशैलीत काही बदल करून आणि संतुलित आहार करुन कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित केली जाऊ शकते. विशेषत: काही भाज्या यासाठी खूप प्रभावी ठरू शकतात.

कोलेस्टेरॉल कसे कमी करावे ?

  1. भेंडी: भेंडीमध्ये विरघळणाऱ्या फायबरचं - soluble fiber प्रमाण भरपूर असतं. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करण्यासाठी मदत होते. हे फायबर पचनासाठी कोलेस्ट्रॉल बांधून शरीरातून काढून टाकण्यास मदत करते.
  2. पालक: पालक‌‌ हा, अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन केचा उत्कृष्ट स्रोत आहे. रक्तवाहिन्यांना कडक होण्यापासून प्रतिबंध करणं आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता यामुळे कमी होते. यामध्ये ल्युटीन नावाचा घटक रक्तवाहिन्यांवर जमा झालेले कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यास मदत करतो. याशिवाय पालक ही कमी कॅलरीजची भाजी असल्याने हृदयासाठीही फायदेशीर आहे.
  3. ब्रोकोली: ब्रोकोलीमध्ये तंतुमयता म्हणजे फायबर चांगल्या प्रमाणात असतं. यामुळे, शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास मदत होते. ही भाजी फायटोन्यूट्रिएंट्स आणि अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे, जी धमन्यांवर कोलेस्टेरॉल जमा होण्याचं प्रमाण कमी करते. याशिवाय, ब्रोकोली हे व्हिटॅमिन सी आणि ए चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
  4. लसूण: कोलेस्ट्रॉल कमी करण्यात लसूण उपयुक्त आहे. त्यातल्या ऍलिसिन नावाचा घटक एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि एचडीएल म्हणजे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. दररोज लसूण खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.
  5. गाजर: गाजरांमध्ये असलेले बीटा-कॅरोटीन एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये थर तयार होण्याची प्रक्रिया मंद होते. यासोबतच, गाजरांमध्ये भरपूर प्रमाणात विरघळणारे फायबर असते, जे कोलेस्टेरॉल शरीरातून काढून टाकण्यास मदत करते. गाजराचे नियमित सेवन केल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते आणि हृदय मजबूत होते.
advertisement
कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी औषधांवर अवलंबून न राहता नैसर्गिक उपायांचा अवलंब करणं कधीही चांगले. या भाज्यांमध्ये भरपूर पोषक घटक असतातच, शिवाय हृदयाशी संबंधित समस्यांपासून बचाव करण्यासही यामुळे मदत होते. या भाज्यांचा समावेश रोजच्या आहारात केला त कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण तर ठेवता येईलच शिवाय निरोगी आयुष्यही जगता येईल.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol Control Tips: कोलेस्ट्रॉल नियंत्रणासाठी टिप्स...5 भाज्या ठरू शकतात रामबाण उपाय...
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement