Glowing Skin - चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी घरगुती उपाय...10 दिवसात डाग आणि सुरकुत्या होतात गायब
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल आणि डाग आणि सुरकुत्या कमी करायच्या असतील तर काही घरगुती उपाय उपयुक्त ठरु शकतात.
मुंबई : तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल आणि डाग आणि सुरकुत्या कमी करायच्या असतील तर काही घरगुती उपाय पाहूया. बेसन, म्हणजे भारतीय स्वयंपाकघरातील एक महत्त्वाचा भाग...केवळ स्वयंपाकातच नाही, तर त्वचेचं सौंदर्य राखण्यासाठीही अनेक फायदे आहेत. बेसन हा त्वचेसाठी उत्तम घटक मानला जातो. यामध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट असतात जे त्वचेला उजळ आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणायची असेल आणि डाग आणि सुरकुत्या कमी करायच्या असतील तर काही प्रभावी उपाय आहेत जे तुम्ही बेसनासह वापरून पाहू शकता.
बेसन आणि दूध
२ चमचे बेसन, २ चमचे दूध, १ चिमूट हळद घ्या. बेसन, दूध आणि हळद एकत्र मिसळा म्हणजे पेस्ट तयार होईल. हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटांनी धुवा. दुधामध्ये असलेलं लॅक्टिक ऍसिड त्वचा मऊ आणि चमकदार बनवते, तर हळदीमध्ये असलेले दाहक -विरोधी गुणधर्म त्वचेसाठी उपयुक्त आहेत.
advertisement
बेसन आणि लिंबू
२ चमचे बेसन, १ चमचा लिंबाचा रस, १ चिमूट मीठ घ्या. हे सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. ते चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटं राहू द्या आणि नंतर धुवा. लिंबाचा रस त्वचेचा टोन हलका करण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
बेसन आणि दही
एक चमचा बेसन, २ चमचे दही, १ चिमूट हळद घ्या. हे घटक चांगले मिसळून पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटांनी कोमट पाण्यानं धुवा. दह्यामध्ये असलेले प्रोबायोटिक्स त्वचेला आर्द्रता देतात आणि ती मऊ करतात.
advertisement
बेसन आणि चंदन पावडर
२ चमचे बेसन, १ चमचा चंदन पावडर, पाणी घ्या. हे साहित्य मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा. चेहऱ्यावर लावा आणि कोरडे झाल्यानंतर धुवा. चंदनाचे गुणधर्म त्वचेला शीतलता आणि ताजेपणा देतात, ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते.
नियमित वापराचे फायदे -
advertisement
या उपायांचा नियमित वापर करून तुम्ही 10 दिवसात तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक पाहू शकता. याशिवाय, हे उपाय डाग आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. लक्षात ठेवा, नैसर्गिक उपायांचा परिणाम हळूहळू होतो, म्हणून संयम ठेवणं गरजेचं आहे आणि नियमितता राखणंही.
या उपायांसोबत आणखी काही गोष्टी लक्षात ठेवा -
पाणी प्या: पुरेसं पाणी प्यायल्यानं त्वचेचं हायड्रेशन वाढतं, ज्यामुळे चमक वाढते.
advertisement
संतुलित आहार: आहारात फळं आणि भाज्या भरपूर खा, हे त्वचेसाठी महत्त्वाचं, पूरक आणि पोषक आहे.
झोप : त्वचेच्या आरोग्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे, त्यामुळे पुरेशी झोप घ्या.
या सोप्या आणि प्रभावी उपायांचा अवलंब करून तुम्ही तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुधारू शकता आणि ती निरोगी ठेवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2024 12:09 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Glowing Skin - चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यासाठी घरगुती उपाय...10 दिवसात डाग आणि सुरकुत्या होतात गायब