Benefits of without sugar coffee - साखरेशिवाय कॉफी शरीरासाठी उपयुक्त...जाणून घ्या शरीराला होणारे फायदे
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
साखरेशिवाय कॉफी पिणं शरीरासाठी उपयुक्त आहे. चयापचय क्रिया सुधारणं, रक्तातील साखर नियंत्रण असे अनेक फायदे साखरेशिवाय कॉफी पिण्यानं शक्य होतात.
मुंबई : तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चहा, कॉफी पिऊन करता का ? बरेच लोक त्यांच्या सकाळची सुरुवात कॉफीनं करतात. कॉफी जगभरात लोकप्रिय पेय आहे. पण, त्यात साखर घातली की त्याचे फायदे काही प्रमाणात कमी होतात. साखरेशिवाय कॉफीची चव वेगळी लागते, आणि ती आरोग्यासाठीही अनेक प्रकारे फायदेशीर असते. बिनासाखरेची कॉफी प्यायल्यामुळे, वजन कमी होतं, रक्तातील साखर नियंत्रित राहते, चयापचय क्रिया सुधारते आणि मेंदूचे कार्य सुधारण्यासाठीही याचा उपयोग होतो. याशिवाय, हृदय आणि यकृताचं रक्षण करण्यासोबतच मानसिक आरोग्य सुधारण्यासाठीही कॉफी उपयुक्त आहे.
- वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
बिना साखरेच्या कॉफीमध्ये कमी कॅलरी असतात. जेव्हा आपण साखर मिसळून कॉफी पितो तेव्हा शरीरात अनावश्यक कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. साखरेशिवाय कॉफी प्यायल्यानं तुमच्या शरीरातील कॅलरीजचं प्रमाण कमी होतं, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
advertisement
- रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त
मधुमेहाच्या रुग्णांसाठी साखर हानिकारक आहे आणि साखरेचं जास्त सेवन केल्यानं रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. साखरेशिवाय कॉफी प्यायल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते आणि मधुमेहाची शक्यता कमी होते.
advertisement
- हृदयाचं आरोग्य सुधारतं
साखर जास्त प्रमाणात खाल्ल्यानं हृदयविकार होऊ शकतो. साखरेशिवाय कॉफी प्यायल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो. याशिवाय कॉफीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स तुमच्या हृदयाचं आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
- चयापचय क्रिया सुधारते
कॉफीमध्ये कॅफिन असतं, ज्यामुळे तुमची चयापचय क्रिया गतिमान होते. कॉफी साखरेशिवाय पिणं शरीरासाठी प्रभावी असतं, कारण साखर चयापचय प्रक्रिया मंद करू शकते.
advertisement
- मेंदूची कार्यक्षमता वाढते -
कॅफिनमुळे मेंदू सक्रिय राहतो. साखरमुक्त कॉफी प्यायल्यामुळे,स्मरणशक्ती, सतर्कता आणि एकाग्रता सुधारते. यामुळे मानसिक थकवा कमी होतो आणि दिवसभर तुम्हाला उत्साही वाटतं.
- अँटिऑक्सिडंटचा उपयोग -
कॉफीमध्ये अनेक प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराचं नुकसान कमी करतात. पण साखर घातली की, अँटिऑक्सिडंट्सचा प्रभाव कमी होतो. साखरेशिवाय कॉफी प्यायल्यानं तुम्हाला जास्त अँटिऑक्सिडंट्स मिळतात.
advertisement
- यकृताच्या आरोग्यासाठी फायदेशीर -
कॉफीचं सेवन यकृतासाठीही फायदेशीर आहे. साखरेशिवाय कॉफी नियमितपणे पिण्यानं यकृताचा दाह आणि फॅटी लिव्हर सारख्या आजारांचा धोका कमी होतो. याशिवाय यकृताच्या कर्करोगाचा धोकाही कमी होऊ शकतो.
- उदासीनता आणि मूड स्विंग कमी करते
बिना साखरेच्या कॉफीचा मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. मूड स्विंग आणि नैराश्याची शक्यता कमी करण्यासाठी कॉफी उपयुक्त ठरू शकते. कॉफीमध्ये साखर नसेल तेव्हा मेंदूमध्ये सेरोटोनिन आणि डोपामाइन सारखी रसायनं स्रवण्यासाठी उपयोग होतो. ज्यामुळे तुमचा मूड सुधारतो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2024 11:12 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Benefits of without sugar coffee - साखरेशिवाय कॉफी शरीरासाठी उपयुक्त...जाणून घ्या शरीराला होणारे फायदे