Cauliflower : फ्लॉवरचे आरोग्यदायी लाभ, फायदे कळले तर आणखी आवडीनं खाल ही भाजी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
थंडीच्या मोसमात येणारा ताजा फ्लॉवर हा चवीचा आणि आरोग्याचा खजिना. फ्लॉवर तुम्हालाही आवडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे कारण फुलकोबी खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
मुंबई: तुम्हालाही फ्लॉवर खायला आवडत असेल आणि आतापर्यंत फक्त भाजी म्हणून त्याकडे पाहत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी...कारण यानंतर तुम्ही ही भाजी आवडीनं खाल.
जाणून घ्या फुलकोबी किंवा फ्लॉवर खाण्याचे फायदे....
फुलकोबी आरोग्यासाठी खूप चांगली मानली जाते. फ्लॉवर वापरून तयार केलेल्या अनेक पाककृती प्रसिद्ध आहेत. थंडीच्या मोसमात येणारा ताजा फ्लॉवर हा चवीचा आणि आरोग्याचा खजिना. न्याहारीसाठी पराठे बनवण्यापासून ते रात्रीच्या जेवणासाठी पुलाव बनवण्यासाठीही ही आवडीची भाजी बनवली जाते.
फ्लॉवर तुम्हालाही आवडत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे कारण फुलकोबी खाल्ल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. यामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटॅमिन 'ए', 'सी' आणि निकोटीनिक ॲसिड सारखे पोषक तत्व आढळतात, जे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
advertisement
1.पचन -
थंडीच्या मोसमात पचनाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशाच समस्या तुम्हालाही त्रास देत असतील तर तुम्ही तुमच्या आहारात फुलकोबीचा समावेश करू शकता. कारण फुलकोबीमध्ये फायबर चांगल्या प्रमाणात आढळतं, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतं.
advertisement
2.वजन -
फुलकोबीमध्ये कॅलरीज कमी असतात, पण त्यात भरपूर फायबर असते. हे खाल्ल्यानं तुम्ही वजन नियंत्रित करू शकता.
3.हृदय-
फुलकोबीमध्ये सल्फोराफेन नावाचा घटक आढळतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित करूंन हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होऊ शकते. म्हणजे फुलकोबी खाणं हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
advertisement
4.हाडं-
फुलकोबीमध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, हे घटक हाडं मजबूत करण्यासाठी मदत करतात.
5. त्वचा -
फुलकोबीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी त्वचा चमकदार बनवण्यासाठी आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यास मदत करते.
6. मधुमेह -
मधुमेह ही आजच्या काळातील एक मोठी समस्या. मधुमेही रुग्णांनी आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. फुलकोबीचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप कमी असतो, त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 11, 2025 5:47 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cauliflower : फ्लॉवरचे आरोग्यदायी लाभ, फायदे कळले तर आणखी आवडीनं खाल ही भाजी


