advertisement

Earthquake: मोठा आवाज अन् जमीन हादरली, नांदेडमध्ये 6 ते 7 गावांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?

Last Updated:

नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सात ते आठ गावांना दुपारी 3 वाजून १५ मिनिटांला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे.

News18
News18
नांदेड : मुंबईजवळील पालघरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या घटना घडत असताना आता मराठवाड्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यात ७ ते ८ गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहे. जमिनीतून गुढ आवाज आला आणि जमीन हादरली. या भूकंपाची तीव्रता रिश्टेर स्केलवर 3.0 नोंदवली गेली आहे. या घटनेमुळे गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,  नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील सात ते आठ गावांना दुपारी 3 वाजून १५ मिनिटांला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहे. मुखेड तालुक्यातील, हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज गावामध्ये हे धक्के जाणवले  आहे. दुपारी अचानक  जमिनीतून गुढ आवाज आला. काही वेळाने जमीन हादरल्याचं गावकऱ्यांनी अनुभवले. या घटनेमुळे गावांमध्ये एकच खळबळ उडाली. लोकांनी घरातून बाहेर येऊन मोकळ्या मैदानात धाव घेतली.
advertisement
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर रिश्टर स्केलवर 3.0 एवढी भूकंपाची नोंद झाली आहे. नां देडच्या मुखेड तालुक्यातील खपराळा गावात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचं सांगण्यात आलं आहे.
पालघर आणि पंढरपूरमध्येही जाणवले धक्के
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पालघरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले होते. तर मागील जानेवारी महिन्यात पंढरपूरमध्ये दिवसभरात दोन वेळा जमिनीतून मोठा आवाज आला होता. १९ जानेवारी रोजी  सकाळी १० वाजून १५ मिनिटांनी पहिली घटना घडली. अचानक भूगर्भातून मोठा आवाज आला होता. त्यानंतर दुपारी ३ वाजता पुन्हा असाच आवाज आला.
advertisement
जमिनीतून गुढ आवाज का येतो?
बऱ्याच जमिनीखाली असलेल्या खडकांच्या थरामध्ये हालचाली होतात किंवा खडकांवर दबाव निर्माण झाला की, त्यामुळे अचानक दबाव निर्माण होतो, त्यामुळे जमिनीखालून आवाज येतो. हे धक्के सौम्य प्रमाणात असतात त्यामुळे भूकंप मोजणाऱ्या रिश्टेर स्केलवर नोंदवले जात नाही. पण हा आवाज लोकांना स्पष्ट ऐकू येतो.
असंही म्हटलं जातं की, पावसाळ्यात पाणी जमिनीखाली भेगांमधून खोलवर जातं तेव्हा तापलेल्या किंवा खोलवर असलेल्या खडकांच्या संपर्कात आलं तर वाफ तयार होऊन हवेचा दाब निर्माण होतो. त्यामुळे खडकांमध्ये आवाज निर्माण होतो, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तसंच, जमिनीखाली नैसर्गिक पोकळ्या असतात, त्यामुळेही असा हवेचा दाब निर्माण होतो. जेव्हा ही हवा दबाव निर्माण करून वरच्या बाजूला येते तेव्हा असा आवाज ऐकू येतो.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नांदेड/
Earthquake: मोठा आवाज अन् जमीन हादरली, नांदेडमध्ये 6 ते 7 गावांमध्ये खळबळ, नेमकं कारण काय?
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement