फायबर आतड्यांसाठी प्रीबायोटिक म्हणून देखील काम करतं. यामुळे आतड्यांमधील फायदेशीर, शरीराला उपयुक्त बॅक्टेरियांना पोषण मिळतं. चिया सीडस्, जवस, सब्जा या तीन बिया आतड्यांच्या स्वच्छतेसाठी आवश्यक आहेत. आतड्यांमधून विषारी पदार्थ काढून टाकणं, तसंच आतड्यांच्या हालचालींना मदत करु शकतात.
Pranayama : शरीर - मनाच्या शांतीसाठीचा प्राचीन उपाय, अन्यही आसनांची माहिती नक्की वाचा
advertisement
चिया सीड्स
चिया सीड्समधे विरघळणारे फायबर असतात. या बिया भिजवल्यावर, बियाणांमुळे एक जेल तयार होतं. यामुळे शरीरात साखर कमी शोषली जाते. आतड्यांतील सूक्ष्मजीवांचं पोषण आणि आतडी स्वच्छ करण्यासाठी या बिया उपयुक्त आहेत. पण या बिया कोरड्या खाऊ नका. खाण्यापूर्वी किमान पंधरा-वीस मिनिटं भिजवा.
Routine Tips : सततच्या थकव्यावर उत्तर, दिनचर्येत बदल करा, दिवसभर फ्रेश राहा
जवस
जवसाच्या बियांमधे ओमेगा-3 आहे. पण या बिया बारीक करून खा. दळलेल्या जवसाच्या बिया सूज, संप्रेरक संतुलन आणि कोलेस्टेरॉल व्यवस्थापनात देखील मदत करतात. जवसाची चटणीही तब्येतीसाठी चांगली. जवस भाजून, त्यात थोडा लसूण घालून ही चटणी चांगली लागते.
सब्जा
सब्जा चिया बियांसारखे दिसतात पण थंड असतात. यातही चिया सीड्ससारखे विरघळणारे फायबर असतात. पचनासाठी आयुर्वेदिक औषधांमधे याचा वापर अनेकदा केला जातो.
