Pranayama : शरीर - मनाच्या शांतीसाठीचा प्राचीन उपाय, अन्यही आसनांची माहिती नक्की वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
योग, विशेषतः प्राणायाम, शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम आहे. मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनसारख्या संप्रेरकांची पातळी देखील यामुळे संतुलित राहते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्यापासून आराम मिळतो.
मुंबई : प्रत्येक दिवस वेगळा असतो, कधी आनंद, कधी दुःख, निराशा, थकवा जाणवू शकतो. पण दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ थकवा, नैराश्य जाणवत असेल तर ते गंभीर मानसिक आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतं. यासाठीच्या योग्य उपचारांबरोबरच, योग आणि प्राणायामद्वारे मानसिक स्थैर्य मिळवता येणं शक्य आहे.
योग, विशेषतः प्राणायाम, शरीर आणि मन दोन्हीसाठी उत्तम आहे. मेंदूतील सेरोटोनिन आणि डोपामाइनसारख्या संप्रेरकांची पातळी देखील यामुळे संतुलित राहते, ज्यामुळे तणाव आणि नैराश्यापासून आराम मिळतो.
भस्त्रिका प्राणायाम: मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी हे प्राणायाम खूप प्रभावी आहे. हे आसन करताना, जलद आणि खोल श्वास घ्यावा लागतो, ज्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो आणि ताण आणि चिंता कमी होते. दररोज सकाळी तीन ते पाच मिनिटं याचा सराव करावा.
advertisement
अनुलोम-विलोम प्राणायाम: शांतपणे श्वास घेत करण्याचा हा व्यायाम आहे. मानसिक संतुलन आणि भावनिक स्थैर्यासाठी याची मदत होते. चिंता कमी करण्याबरोबरच रक्तदाब नियंत्रण आणि झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे उपयुक्त आहे.
बालासन: या आसनाला बाल आसन असंही म्हणतात. ताण, भीती आणि असुरक्षितता कमी करण्यासाठी हे आसन महत्त्वाचं आहे.
advertisement
शवासन: या आसनाच्या सरावानं ताण आणि अस्वस्थता कमी होते आणि मानसिक थकवा दूर होतो. या आसनानं डोकेदुखी, थकवा आणि निद्रानाश बरा होऊ शकतो. शवासनामुळे रक्तदाब कमी करण्यास मदत होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 7:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pranayama : शरीर - मनाच्या शांतीसाठीचा प्राचीन उपाय, अन्यही आसनांची माहिती नक्की वाचा