Fatty Liver : खूप वेळ बसून काम करणं धोकादायक, फॅटी लिव्हरनं तब्येतीचं होईल नुकसान
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
विशेषतः भारतातील आयटी क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचं काम बहुतांश वेळा बसून असतं पण यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. आपल्या यकृतात जास्त चरबी जमा होते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. यामुळे हळूहळू शरीरातला हा महत्त्वाचा अवयव कमकुवत होतो आणि वेळीच काळजी घेतली नाही तर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग देखील होऊ शकते.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तुम्ही फॅटी लिव्हर शब्द ऐकलाय का ? आधी मधुमेह, रक्तदाब सर्रास ऐकू येत होतं त्यात आता फॅटी लिव्हरची भर पडली आहे. आधुनिक जीवनशैली आणि तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्यांमुळे जीवन सोपं झालं असेल, पण आता त्याच्याशी संबंधित अनेक आरोग्य समस्या देखील दिसू लागल्या आहेत.
विशेषतः भारतातील आयटी क्षेत्राशी संबंधित कर्मचाऱ्यांचं काम बहुतांश वेळा बसून असतं पण यामुळे गंभीर आजारांचा धोका वाढला आहे. आपल्या यकृतात जास्त चरबी जमा होते तेव्हा त्याला फॅटी लिव्हर म्हणतात. यामुळे हळूहळू शरीरातला हा महत्त्वाचा अवयव कमकुवत होतो आणि वेळीच काळजी घेतली नाही तर सिरोसिस किंवा यकृताचा कर्करोग देखील होऊ शकते.
advertisement
नेचर सायंटिफिक रिपोर्ट्स जर्नलमध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार, हैदराबादमधील 84 टक्के आयटी कर्मचारी फॅटी लिव्हरच्या समस्येनं ग्रस्त असल्याचं आढळून आलं. ही आकडेवारी अत्यंत धक्कादायक आहे आणि सवयी आणि दिनचर्येकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज स्पष्ट दिसून येते.
या अभ्यासातून फॅटी लिव्हर होण्याची अनेक महत्त्वाची कारणं पुढे आली आहेत, आणि ही थेट आपल्या दैनंदिन सवयींशी संबंधित आहेत. सर्वात मोठ कारण म्हणजे फास्ट फूड आणि पॅकेज्ड फूड. आयटी क्षेत्रात अनेकदा रात्री उशिरापर्यंत काम करावं लागतं, म्हणून झटपट अन्न खाण्याचा कल दिसून येतो. परंतु या सवयीचा यकृतावर वाईट परिणाम होतो. यासोबतच, तासन्तास खुर्चीवर बसल्यानं चरबी वाढते, जी यकृतात जमा होते आणि त्याचं नुकसान होण्यास सुरुवात होते.
advertisement
झोपेचा अभाव आणि सततचा ताण यामुळे यकृत कमकुवत होतं. बऱ्याच वेळा लोक ताण कमी करण्यासाठी अंमली पदार्थांचा वापर करतात, परंतु हे यकृतासाठी सर्वात धोकादायक ठरू शकतं. सुरुवातीला फॅटी लिव्हर ओळखणे थोडं कठीण असतं कारण त्याची लक्षणं स्पष्टपणे दिसत नाहीत. पण जसजसा हा आजार वाढत जातो तसतसे शरीर काही संकेत देऊ लागतं.
advertisement
उदाहरणार्थ, कोणतेही जड काम न करताही सतत थकवा जाणवणं, पोटाच्या वरच्या भागात जडपणा किंवा सौम्य वेदना, भूक न लागणं, कोणत्याही कारणाशिवाय वजन कमी होणं, डोळे किंवा त्वचा पिवळी पडणं, पायांना सूज येणं किंवा त्वचेला खाज सुटणं, ही सर्व लक्षणे फॅटी लिव्हरची आहेत. ही लक्षणं बराच काळ टिकून राहिली तर विलंब न करता डॉक्टरांकडून स्वतःची तपासणी करून घेणं महत्वाचे आहे.
advertisement
फॅटी लिव्हर टाळण्यासाठी काय करावं -
- जीवनशैलीत वेळीच बदल केले तर हा आजार सहज टाळता येतो. सर्वप्रथम, तुमच्या खाण्याच्या सवयी सुधारा - ताजी फळे, हिरव्या भाज्या, डाळी, संपूर्ण धान्य खा आणि दररोज कमी तेलकट पदार्थ खा.
advertisement
- तळलेले पदार्थ आणि गोड पेयं टाळणं महत्वाचे आहे. तसेच, दररोज किमान तीस मिनिटं चालणे, योगा किंवा कोणताही हलका व्यायाम करणं फायदेशीर आहे. वजन नियंत्रणात ठेवा कारण लठ्ठपणाचा थेट परिणाम यकृतावर होतो.
- याशिवाय, शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि दररोज 7 ते 8 तास झोपा. या छोट्या सवयींमुळे यकृत दीर्घकाळ निरोगी ठेवू शकता.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 05, 2025 2:41 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fatty Liver : खूप वेळ बसून काम करणं धोकादायक, फॅटी लिव्हरनं तब्येतीचं होईल नुकसान