Malasana : पचनसंस्थेसाठी उत्तम आसन, महिलांसाठी विशेष फायदेशीर, ही माहिती नक्की वाचा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
काही योगासनं नियमित केल्यानं एकाच वेळी अनेक फायदे मिळू शकतात. यापैकी एक म्हणजे मलासन. दररोज सकाळी फक्त तीन मिनिटं मलासन करणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं.
मुंबई : योगासनं नियमित करणाऱ्यांना सहसा आजाराचा खूप त्रास होत नाही कारण योगामुळे शरीर लवचिक होतच आणि शरीर आतून बरं होण्यासाठीही मदत होते. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी योगासनं दररोज करावीत.
काही योगासनं नियमित केल्यानं एकाच वेळी अनेक फायदे मिळू शकतात. यापैकी एक म्हणजे मलासन. दररोज सकाळी फक्त तीन मिनिटं मलासन करणं शरीरासाठी उपयुक्त ठरतं.
मलासनाला 'गारलँड पोज' किंवा 'डीप स्क्वॅट' असंही म्हटलं जातं. हे आसन अनेक शारीरिक आणि मानसिक समस्यांवर उपाय ठरू शकतं. बहुतेक वेळ बसून काम करणाऱ्यांसाठी हे आसन खूप महत्त्वाचं आहे.
advertisement
पचनसंस्था मजबूत होईल
मलासनामुळे पोटाच्या खालच्या भागात थोडासा दाब निर्माण होतो, ज्यामुळे पचनसंस्था सक्रिय होते. यामुळे अपान वायु संतुलित होतो, ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुधारते. दररोज मलासन केल्यानं बद्धकोष्ठतेसारख्या समस्या कमी होतात आणि पोट हलकं वाटतं.
पाठ आणि पाठीच्या कण्याला आराम
मलासन केल्यानं पाठीचा कणा सरळ राहतो आणि कंबर ताणली जाते. यामुळे पाठीच्या स्नायूंवरील ताण कमी होतो, ज्यामुळे पाठीचा कणा मजबूत होतो आणि पाठदुखीपासून आराम मिळतो.
advertisement
गुडघे आणि घोट्यांत लवचिकता
मलासनामुळे पायांच्या सांध्यात म्हणजेच गुडघे आणि घोट्यात हळूहळू लवचिकता येते. ज्यांना सांध्यात कडकपणा किंवा वेदना होतात त्यांच्यासाठी हे विशेष फायदेशीर आहे.
महिलांसाठी फायदेशीर
हे आसन पेल्विक फ्लोअरला मजबूत करतं आणि गर्भाशय आणि पुनरुत्पादक अवयवांमधे यामुळे रक्त प्रवाह वाढतो. यामुळे, मासिक पाळी दरम्यान होणारे पेटके आणि अस्वस्थता कमी होते.
advertisement
योग शिक्षकांच्या मते, मलासन कठीण आसन नाही. त्यामुळे सकाळी फक्त तीन मिनिटं हे आसन करा. पचनक्रिया, सांधे, पाठीचा कणा आणि मानसिक आरोग्यासाठी म्हणून हे आसन नैसर्गिक टॉनिक काम करतं. दररोज फक्त एक आसन करून कोणत्याही औषधाशिवाय अनेक समस्यांपासून मुक्त होऊ शकता.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2025 8:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Malasana : पचनसंस्थेसाठी उत्तम आसन, महिलांसाठी विशेष फायदेशीर, ही माहिती नक्की वाचा


