Cough : सर्दीवर रामबाण आयुर्वेदिक उपाय, अशा पद्धतीनं वाफ घ्या, सर्दी होईल गायब

Last Updated:

ऋतू बदलताना सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण वाढतं. सर्दी, नाक बंद होणं किंवा घसा खवखवणं यासारख्या समस्या जाणवायला सुरु होतात आणि अस्वस्थ वाटतं. यासाठी आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे वाफ घेतली तर नाक मोकळं होईल आणि श्वास घेणं शक्य होईल.

News18
News18
मुंबई : पावसाळा किंवा कोणताही ऋतू बदलताना सर्दी, खोकला होण्याचं प्रमाण वाढतं. सर्दी, नाक बंद होणं किंवा घसा खवखवणं यासारख्या समस्या जाणवायला सुरु होतात आणि अस्वस्थ वाटतं.
हवामानात थोडासा बदल होतो, तेव्हा तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल तर कोणतंही औषध घेण्याआधी एक उपाय नक्की करुन बघा. या स्थितीत त्वरित आराम मिळवण्यासाठी, आयुर्वेदात काही सोपे आणि प्रभावी उपाय आहेत. यातला एक उपाय म्हणजे वाफ घेणं.
सर्दी सुरु झाली की आधी वाफ घ्या. यासाठी ओवा हा चांगला पर्याय आहे. यासाठी एक चमचा ओवा, एक तमालपत्र आणि चिमूटभर काळी मिरी आवश्यक आहे.
advertisement
ओवा, एक तमालपत्र आणि चिमूटभर काळी मिरी पाण्यात टाका आणि पाणी चांगलं उकळेपर्यंत आणि त्यातून वाफ येईपर्यंत उकळवा. उकळल्यावर गॅस बंद करा. तयार केलेलं पाणी एका मोठ्या भांड्यात ठेवा.
डोक्यावर टॉवेल ठेवा आणि पाच सात मिनिटं खोलवर वाफ घ्या.
advertisement
ओवा आणि काळी मिरीची तिखट वाफ नाकाच्या बंद झालेल्या जागा उघडते आणि श्वास घेण्याची प्रक्रिया सोपी होते. तमालपत्र विषाणूंशी लढण्यास मदत करते. सर्दी सुरु झाल्यावर लगेचच वाफ घेतली तर संसर्गाचं प्रमाण कमी होतं.
तसंच जर तुम्हाला सर्दी, खोकला, बंद नाक किंवा छातीत जडपणा यासारख्या समस्या असतील तर या स्थितीत तुम्ही तुळशी-ओव्याची वाफ घेऊ शकता. यासाठी तुम्हाला सात-आठ तुळशीची पानं, एक चमचा ओवा, चिमूटभर खडे मीठ आणि दोन-तीन थेंब निलगिरी तेल लागेल.
advertisement
वाफ घेण्यासाठी हे सर्व जिन्नस पाण्यात टाका आणि चांगल्या प्रकारे उकळा. डोकं टॉवेलनं झाकून ठेवा आणि सुमारे पाच-सात मिनिटं वाफ घ्या. तुळस आणि ओवा हे दोन्ही घटक कफ काढून टाकण्यास मदत करतात.
निलगिरीचं तेल घातलं असेल तर त्याचा परिणाम आणखी जलद होतो. यामुळे छाती आणि सायनस दोन्ही साफ होतात आणि बंद झालेलं नाक उघडतं.
advertisement
या गोष्टी लक्षात ठेवा
वाफ श्वास घेताना नेहमी डोळे बंद ठेवा. वाफ घेताना चेहरा आणि वाफेचं भांडं यात योग्य अंतर ठेवा. दिवसातून एक-दोन वेळा वाफ घेणं पुरेसं आहे. या सर्वांव्यतिरिक्त, लहान मुलांना वाफ देताना अधिक काळजी घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Cough : सर्दीवर रामबाण आयुर्वेदिक उपाय, अशा पद्धतीनं वाफ घ्या, सर्दी होईल गायब
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement