LPG Vs Induction : गॅस सिलेंडरच की इंडक्शनचा पर्याय? दोघांपैकी काय आहे जास्त फायदेशीर? कोणती पद्धत वाचवते पैसे?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
काही लोक आता इलेक्ट्रिक इंडक्शनकडे वळले आहेत आणि यावर स्वयंपाक बनवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नेहमीचा गॅस परवडतो की विजेवर चालणारं इंडक्शन? या दोन्ही पर्यायांची गणितं आपण सविस्तर मांडणार आहोत.
मुंबई : प्रत्येक घरात स्वयंपाकघर हे महत्वाचं ठिकाण आहे आणि या महत्वाच्या ठिकाणी गॅस सिलेंडर म्हणजे अग्नी खूपच महत्वाचा आहे. त्याच्याशिवाय जेवण बनवणे शक्यच नाही. पण जेव्हा याच गॅसमुळे जेव्हा शेगडीवर नारंगी, लाल अशी आग जळू लागते तेव्हा गृहिणींना समजून जातं की आता गॅस संपण्याची वेळ जवळ आली आहे. आधीच सिलेंडर मागवून ठेवला असेल तर ठिक पण जर सिलेंडर मागवला नसेल तर मात्र गृहिणींना धडकी भरते. त्यात आता युद्ध परिस्थीतीमध्ये तर गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. अशा गृहिणींना चिंता आहे गॅस सिलेंडरची आणि स्वयंपाकघरात होणाऱ्या जेवणाची.
सरकार जरी पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करत असलं, तरी प्रत्यक्षात वेळेवर डिलिव्हरी न मिळण्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. काही लोक आता इलेक्ट्रिक इंडक्शनकडे वळले आहेत आणि यावर स्वयंपाक बनवू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता एक मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नेहमीचा गॅस परवडतो की विजेवर चालणारं इंडक्शन? या दोन्ही पर्यायांची गणितं आपण सविस्तर मांडणार आहोत.
advertisement
1. एलपीजी (LPG) विरुद्ध इंडक्शन: खर्चाची गोळाबेरीज
सामान्य घरगुती सिलेंडर (14.2किलो) आज साधारण 950 रुपयांच्या आसपास मिळतो. पण गॅस शेगडीचं एक तांत्रिक वास्तव असं आहे की, तिची कार्यक्षमता केवळ 55% असते. म्हणजेच, गॅस जळताना त्यातील निम्मी उष्णता हवेत वाया जाते.
दुसरीकडे, इंडक्शन कुकटॉप हा विजेचा वापर थेट भांडी तापवण्यासाठी करतो. त्यामुळे ऊर्जेची नासाडी कमी होते. ऊर्जा अर्थशास्त्राच्या (Energy Economics) अहवालानुसार, जर तुमच्या भागातील विजेचे दर सरासरी असतील, तर विनाअनुदानित सिलेंडरच्या तुलनेत इंडक्शनवर स्वयंपाक करणं अधिक स्वस्त पडतं. एका अंदाजानुसार, इंडक्शनचा वापर करून एखादं कुटुंब महिन्यात 180 ते 1000 रुपयांपर्यंतची बचत करू शकतं
advertisement
2. हॉटेल उद्योगावरही 'गॅस'चे सावट
गॅसच्या अनियमित पुरवठ्याचा फटका केवळ घरांनाच नाही, तर हॉटेल मालकांनाही बसला आहे. काही रिपोर्ट्सनुसार, अनेक रेस्टॉरंट्सनी गॅस वाचवण्यासाठी त्यांच्या मेनूमधून काही वेळखाऊ पदार्थ तात्पुरते हटवले आहेत. यामुळे छोटे व्यावसायिक आता बॅकअप म्हणून मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक शेगड्या खरेदी करत आहेत.
3. तरीही लोक गॅस सिलेंडरलाच पसंती का देतात?
खर्च कमी असूनही भारतीय घरांमध्ये 'गॅस' हाच राजा आहे. याची काही महत्त्वाची कारणं खालीलप्रमाणे आहेत:
advertisement
लोडशेडिंगचे संकट: आजही अनेक निमशहरी आणि ग्रामीण भागांत वीज कपात मोठी असते. अशा वेळी विजेवर अवलंबून राहणं धोक्याचं वाटतं.
'लाईट गेली तर उपाशी राहायचं का?' हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो.
भारतीय स्वयंपाक पद्धती: फुलके किंवा भाकरी थेट आचेवर शेकणं, फोडणी देणं किंवा संथ आचेवर कढण करणं हे गॅस शेगडीवर जेवढं सहज होतं, तेवढं इंडक्शनवर होत नाही.
advertisement
भांड्यांचा खर्च: इंडक्शनसाठी खास 'फेरोमॅग्नेटिक' (लोखंड किंवा स्टील) तळाची भांडी लागतात. घरातील जुनी तांब्याची किंवा ॲल्युमिनियमची भांडी इंडक्शनवर चालत नाहीत. नवीन भांडी खरेदी करणं म्हणजे सुरुवातीचा खर्च वाढवणं आहे.
तुमच्यासाठी कोणता पर्याय उत्तम?
जर तुमच्याकडे वीज पुरवठा चोवीस तास असेल आणि तुम्हाला झटपट स्वयंपाक करायचा असेल, तर इंडक्शन हा आर्थिकदृष्ट्या उत्तम पर्याय आहे. पण, जर तुमच्याकडे पारंपारिक पद्धतीने स्वयंपाक केला जात असेल, तर गॅस सिलेंडरला 'बॅकअप' म्हणून इंडक्शन वापरणं हा सध्याच्या परिस्थितीत सर्वात सुरक्षित मार्ग ठरेल.
advertisement
बदलत्या जागतिक परिस्थितीमुळे इंधनावर विसंबून राहणं आता महागडं ठरतंय. अशा वेळी किचनमध्ये 'हायब्रिड' मॉडेल (गॅस आणि इंडक्शन) स्वीकारणं हेच खिशासाठी आणि वेळेसाठी फायदेशीर ठरेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 16, 2026 3:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
LPG Vs Induction : गॅस सिलेंडरच की इंडक्शनचा पर्याय? दोघांपैकी काय आहे जास्त फायदेशीर? कोणती पद्धत वाचवते पैसे?








