रात्री झोपण्याआधी मोबाईलचा वापर धोकादायक
आपल्यापैकी अनेक जण 8 तासांची झोप घेत नाहीत. झोपेअभावी शरीरावर गंभीर परिणाम होतात आणि कॅन्सर सारख्या आजाराचा धोका वाढतो, असे डॉ. प्रतिक पाटील सांगतात. कॅन्सरपासून बचाव करायचा असेल तर दररोज 8 तासांची पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. झोपताना अनेकजण मोबाईल शेजारी ठेवतात, पण ही सवय आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. त्यामुळे झोपताना मोबाईल दूर ठेवावा, तसेच झोपण्याच्या किमान एक तास आधी आणि सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईलचा वापर टाळावा, असा सल्ला त्यांनी दिला.
advertisement
Sleep Quality: रात्री झोप लागत नाही? हे घरगुती उपाय करतील कमाल, रात्रभर ताणून द्याल!
आरोग्य टिकवण्यासाठी संतुलित आहार घ्या
आरोग्य टिकवण्यासाठी आहारात काही बदल करण्याची गरज असल्याचंही डॉ. पाटील सांगतात. त्यांच्या मते, दैनंदिन आहारामध्ये साखरेचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करावा. शरीराला रोगप्रतिकारक शक्ती मिळावी यासाठी व्हिटॅमिन सी युक्त फळे व पालेभाज्या नियमितपणे खाव्यात.
बाहेरून आणलेल्या पालेभाज्या व फळे मिठाच्या पाण्यात अर्धा तास भिजवून मगच खाव्यात. यासोबतच ताणतणाव टाळणे आणि व्यसनांपासून दूर राहणे हे देखील कॅन्सर टाळण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्ला देखील ते देतात.