ब्राऊन शुगर एकाच प्रकारच्या केनपासून तयार केले जातात. ब्राऊन शुगरमध्ये मोलोसिस असल्यामुळे त्याचा रंग आणि थोडीशी चव बदलते. बाकी दोन्ही साखरेतील गुणधर्म सारखाच असतो. आपण कुठलीही साखर खाल्ली तरी त्यापासून आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजच तयार होते. ब्राऊन शुगरमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कॅल्शियम, लोह आणि पोटॅशियम असतात. थोड्याफार प्रमाणात मिनरल्स देखील असतात. पांढऱ्या साखरेत मात्र हे सर्व घटक नसतात. हे घटक ब्राऊन शुगरमध्ये असले तरी ते कमी प्रमाणातच असतात. त्यामुळे दोन्ही साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स सारखाच आहे.
advertisement
Edible Oil: योग्य खाद्य तेल कसे निवडावे? चांगल्या आरोग्यासाठी 'या' तेलांचा करा आहारात समावेश
दोन्ही साखर खाल्ल्यानंतर ग्लुकोज तयार होण्याचं प्रमाण सारखंच आहे. कॅलरीज देखील सारख्याच आहेत. फक्त 19-20 चा फरक आहे. काही पदार्थांमध्ये आपण जर ब्राऊन शुगर वापरले तर थोडा फ्लेवर चेंज होतो. जसं की डार्क चॉकलेट किंवा ब्राउनीमध्ये त्याचा वापर केल्यास रंग आणि फ्लेवरचा थोडा फरक येतो. तरीही मधुमेह असणाऱ्यांनी दोन्ही प्रकारची साखर न खाणंच चांगलं आहे. तसेच साखरेच्या ऐवजी गूळ किंवा मधाचा वापर देखील करणं फायद्याचं ठरू शकतं, असं आहारतज्ज्ञ सांगतात.