तिशीच्या टप्प्यावर स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग, फायब्रॉइड्स आणि योग्य पोषणाचा अभाव यांचा धोका देखील वाढतो. त्यामुळे, योग्य आहार सर्वात आवश्यक आहे. तीस वर्षांनंतरच्या महिलांसाठी आरोग्यतज्ज्ञांनी सुचवलेले सहा अन्नघटक संप्रेरकांचं संतुलन, ऊर्जा निर्मिती आणि मासिक पाळीसाठी महत्त्वाचे ठरतात.
Kidneys : मूत्रपिंडांसाठी पोषक आहार महत्त्वाचा, या फळांची होईल मदत
अळशीच्या बिया किंवा जवस
advertisement
अळशीच्या बियांमधे लिग्नान नावाचा घटक भरपूर प्रमाणात असतो, यामुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत होते. मासिक पाळी नियमित करण्यासाठी आणि इस्ट्रोजेन संतुलन राखण्यासाठी देखील प्रभावी आहेत. यासाठी दररोज एक चमचा जवस बिया खाऊ शकता.
डाळिंब
डाळिंबात एलाजिक एसिड असतं, यामुळे गर्भाशय निरोगी ठेवण्यासाठी आणि फायब्रॉइड्स कमी करण्यासाठी मदत होते. संप्रेरकांचं संतुलन करण्यासाठीही डाळिंब उपयुक्त आहे. यासाठी पोषणतज्ज्ञ दररोज एक वाटी डाळिंब खाण्याची शिफारस करतात.
आवळा
आवळा हा व्हिटॅमिन सीचा एक पॉवरहाऊस आहे, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यामुळे कोलेजन उत्पादनास मदत होते आणि केस आणि त्वचा निरोगी राहतात. यासाठी, दररोज एक ताजा आवळा किंवा एक चमचा आवळ्याचा रस पिऊ शकता.
Anulom Vilom : शरीराला आणि मनालाही मिळेल ऊर्जा, अनुलोम - विलोम नक्की करा
पुदिना
पुदिन्यात भरपूर प्रमाणात लोह असतं आणि शंभर ग्रॅम पुदिना शरीरासाठी आवश्यक लोहाच्या गरजेपैकी सत्तर टक्के गरज भागवू शकतो. महिलांमधे मासिक पाळी दरम्यान कमी हिमोग्लोबिन किंवा थकवा येणं यासारख्या समस्यांवर उपयुक्त उपाय आहे.
चिया सीडस्
चिया सीडस् हा ओमेगा 3 आणि फायबरचा चांगला स्रोत आहे. हृदय, मेंदू आणि गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी याची मदत होते. दररोज एक चमचा चिया सीडस् एक ग्लास पाण्यात भिजवून खाऊ शकता.
तीळ
तीळ नैसर्गिकरित्या प्रोजेस्टेरॉन वाढविण्यास मदत करतात. ज्यामुळे पीएमएसची लक्षणं कमी होतात आणि मासिक पाळी नियमित राहते. मासिक पाळीच्या पंधराव्या दिवसापासून दररोज एक चमचा तीळ खाऊ शकता.
