1. शारीरिक हालचाल
आरोग्यदायी जीवनासाठी शारीरिक हालचाल अत्यंत महत्त्वाचे असतात. जास्तीत जास्त सक्रिय राहिल्यास शरीर निरोगी राहते. शारीरिक क्रियेसाठी जिमला जाण्याची गरज नसून, दैनंदिन कामात शरीराची हालचालही पुरेसे आहे. सायकलिंग, योगा, धावणे, पोहणे यांसारख्या क्रियाकलापांनी शरीरातील रक्ताभिसरण आणि मेटाबॉलिझम सुधारतो.
2. संतुलित आहार
या देशांतील निरोगी लोकांचे आहार Mediterranean डायटवर आधारित असतात. यात अखंड धान्य, डाळी, हिरव्या पालेभाज्या, भात, मासे, बिया, नट्स, मसाले, ऑलिव्ह तेल, ताजे फळे आणि सूप यांचा समावेश असतो. शुध्द केलेले आणि जास्त प्रक्रिया केलेले पदार्थ टाळले जातात. हे आहार घटक भारतीय पारंपरिक आहारासारखेच असतात.
advertisement
हे ही वाचा : Astrology: शनिचा वार सूर्य गाजवणार! 16 नोव्हेंबरपासून या राशींना अनपेक्षित लाभ; भाग्योदय
3. सामाजिक जीवन
निरोगी जीवन असलेल्या देशांतील लोकांचे सामाजिक जीवन उत्कृष्ट असते. जपानमध्ये, मजबूत सामाजिक नात्यांमुळे मानसिक आरोग्य सुधारते. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यास येथे महत्त्व दिले जाते, ज्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. भारतातील गावांमध्येही मजबूत सामाजिक जीवन दिसून येते. मित्रांसोबत संवाद, दुःख-सुखात सहभागी होणे हे निरोगी जीवनाचे लक्षण आहे.
4. आनंदी राहणे
जीवन निरोगी ठेवण्यासाठी आनंदी असणे अत्यंत आवश्यक आहे. उदासीनता, नैराश्य, चिंता आणि ताण यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या देशांतील लोक थोड्याश्या गोष्टींत समाधान मानतात. नैसर्गिक वातावरणात वेळ घालवणे, हायकिंग, ट्रेकिंगमध्ये सहभागी होणे यामुळे त्यांना आनंद मिळतो. ताण कमी ठेवण्यासाठी योग, ध्यान आणि कुटुंबीयांसोबत संवाद साधला जातो.
हे ही वाचा : सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा हे 1 काम करा, शरीर तंदुरुस्त होईल, GYM ची गरजच पडणार नाही
5. पुरेशी झोप
झोपेत असताना शरीर आपले अवयव दुरुस्त करत असते, आणि स्मरणशक्ती मस्तिष्कात संग्रहित होत असते. 7 ते 8 तासांची शांत झोप निरोगी जीवनासाठी आवश्यक आहे. मध्येच उठणे किंवा अर्धवट झोपणे यामुळे शरीराला विश्रांती मिळत नाही. त्यामुळे दररोज पुरेशी आणि सलग झोप घेणे आवश्यक आहे.