लिंबू आणि आल्याचा रस
लिंबू आणि आलं हा रस प्यायल्यानं चयापचयाचा वेग वाढतो आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यासाठी, एक ग्लास पाणी, एक चमचा लिंबाचा रस आणि अर्धा चमचा आल्याची पेस्ट चांगली मिसळा. लिंबू आणि आल्याचा रस तयार आहे.
Beetroot Face Pack : त्वचेचा पोत सुधारण्यासाठी वापरा बीट, सुरकुत्या, काळी वर्तुळं होतील कमी
advertisement
काकडीचा रस
हा रस तुमच्या पोटाचं आरोग्य स्थिर ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे शरीराला आवश्यक आर्द्रता राखली जाते, काकडीमध्ये खूप कमी कॅलरी असतात. हा रस नियमितपणे प्यायला तर शरीरात खराब चरबी जमा होण्याचं प्रमाण कमी होतं.हा रस बनवण्यासाठी काकडी नीट धुवून, सोलून त्याचे तुकडे करुन रस काढा आणि प्या.
कारलं आणि मेथीचा रस
कारलं आणि मेथीचा रस देखील चरबी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. यामुळे तुमचं चयापचय मजबूत करण्यासाठी उपयोग होतो. शरीरात जमा झालेली चरबी वेगानं वितळवली जाते. हे करण्यासाठी अर्ध कारलं आणि 1 चमचा मेथी दाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी त्याचा रस तयार करा.
Cracked Heels : भेगाळलेल्या टाचांवर हा उपाय करुन बघा, भेगा भरुन येतील, पाय होतील मऊ
ग्रीन टी
सकाळी ग्रीन टी प्यायल्यामुळे तुमची चयापचय क्रियाही वाढते. यामुळे शरीरात जमा झालेली अतिरिक्त चरबी वेगानं वितळते. त्यात कॅफिनचं प्रमाण कमी असतं. अशा परिस्थितीत याचा तुमच्या झोपेवर परिणाम होत नाही ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहता.