वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात कर्ता पुरुष किंवा शेतकऱ्याला कायमस्वरूपी दिव्यांगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये दिले जातात तर गंभीर इजा झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंत ही रक्कम दिली जात आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे पशुहानी गाय, म्हैस, बैल यांची जीवित हानी झाल्यास पशूंच्या बाजारकिमतीच्या 75 टक्के किंवा 70 हजार रुपये यापेक्षा जी कमी असेल तितकी रक्कम दिली जाते.
advertisement
वन्यप्राण्यांमुळे पीकनुकसान झाले असल्यास त्यासाठी महाराष्ट्र वनविभाग वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज करावा लागतो, त्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते. सूचनेनुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यास वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी येऊन पंचनामे करतात. त्यानंतर वनपरिक्षेत्र कार्यालयात उपक्रम सादर करतात.
त्यानुसार नुकसानभरपाई किंमत ठरवली जाते. तसेच ते प्रकरण सहाय्यक वनसंरक्षक विभागीय कार्यालयात पाठवले जाते. तेथून फाइल मंजूर झाल्यास संबंधित शेतकऱ्याच्या नावाचा चेक येतो, नंतर तो चेक शेतकऱ्याला दिला जातो, असे देखील कुटे यांनी सांगितले आहे.