1. गरम पाण्यानं शेकणे
हिवाळ्यात कमी तापमानामुळे सांध्यांमध्ये पेटके आणि वेदना वाढतात. यासाठी शरीर उबदार ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आंघोळ करताना अंग शेकणं किंवा हिटिंग पॅडचा वापर करु शकता. यामुळे रक्तदाब सुधारेल आणि वेदना कमी होईल.
2. हलका व्यायाम करा
हिवाळ्यात सांधेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी हलका व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्ही योगा, किंवा चालणं यासारखे व्यायाम करु शकता. यामुळे तुमचे सांधे लवचिक तर राहतीलच पण वेदनाही कमी होतील. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे सूज आणि वेदना कमी होतात.
advertisement
Gasses - Acidity: गॅस, ॲसिडिटीच्या त्रासामुळे वैतागलात ? या सवयी बदला, नक्की होईल फायदा
3. गरम आणि थंड पॅकचा वापर
वेदना कमी करण्यासाठी गरम आणि थंड पॅक वापरले जाऊ शकतात. कोल्ड पॅकमुळे सूज कमी होते, तर गरम पॅकमुळे स्नायूंना आराम मिळतो.
4. मसाज आणि तेलाचा वापर
सांधेदुखी कमी करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑईल किंवा कोणत्याही तेलानं हलका मसाज करू शकता. विशेषतः आलं, हळद आणि लसूण तेलामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करतात.
5. निरोगी आहार
सांधेदुखीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आहाराचीही मोठी भूमिका असते. हाडं मजबूत करण्यासाठी, दही, दूध, हिरव्या पालेभाज्या आणि मासे अशा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी समृद्ध असलेल्या घटकांचा वापर करा. मासे, अक्रोड यांसारखे ओमेगा -3 फॅटी ऍसिड असलेले पदार्थही खा.
6. वजन नियंत्रण
वजन जास्त असल्यानं सांध्यांवर, विशेषत: गुडघे आणि कंबरेच्या सांध्यांवर दाब वाढतो. हिवाळ्यात या दाबामुळे वेदना वाढू शकतात. त्यामुळे तुमच्या वजनावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. संतुलित आहार आणि नियमित व्यायामामुळे वजन कमी होण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे सांध्यांवरील दबाव कमी होईल आणि वेदनांपासून आराम मिळेल.
Soaked Dry Fruits : सुका मेवा भिजवून खाण्याचे फायदे, शरीरासाठी पौष्टिकतेचा खजिना
7. पुरेसं पाणी प्या
हिवाळ्यात थंड हवेमुळे पाणी पिणं विसरु नका. हिवाळ्यात पुरेसं पाणी पिणं गरजेचं आहे. पाणी सांध्यातील लवचिकता कायम राखते, ज्यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होते. दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
8. आलं आणि हळद
आलं आणि हळदीमध्ये नैसर्गिक दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात. आल्याचा रस किंवा हळदीचं दूध प्या. यामुळे वेदना तर कमी होतीलच शिवाय शरीर आतून उबदार राहिल.
9. सूर्यप्रकाशाचा वापर
हाडं आणि सांध्यांसाठी आवश्यक असलेल्या सूर्यप्रकाशात असलेल्या व्हिटॅमिन डीचा शरीराला फायदा होतो. दिवसभरात काही वेळ उन्हात बसल्यानं शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता भरुन निघते.
