अशावेळी युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे असते. शरीरातील युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्हाला आहार आणि जीवनशैली बदल केले पाहिजे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही युरिक ॲसिडवर नियंत्रण ठेवता येते. तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये एक छोटासा पदार्थ टाकल्यानंतर तुम्ही युरिक ॲसिडवर नियंत्रण मिळवू शकता.
'तुम्हाला सतत ॲसिडीटी होते? करा ‘हे’ सोपे प्रकार, ॲसिडीटीला सारा दूर'
advertisement
शरीरातील युरिक ॲसिडची पातळी कमी करण्यासाठी आल्याचे सेवन फायदेशीर ठरते. आल्यामध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, शरीरातील वाढलेलं युरिक ॲसिड कमी करण्यास देखील आलं मदत करते. आल्याच्या सेवनाने शरीरातील टॉक्सिन्स आणि प्युरिन काढून टाकण्यास मदत होते. आल्याच्या नियमित सेवनाने युरिक ॲसिडच्या लक्षणांपासून आराम मिळू शकतो.
आल्याचे सेवन कसे करावे?
युरिक ॲसिडची पातळी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही आल्याच्या चह्याचे सेवन करू शकता. यासाठी कढईतदोन कप पाणी गरम करा. एक इंच आले ठेचून त्यात घाला. पाण्याला चांगली उकळी आली की ग्लासमध्ये गाळून घ्या. नियमितपणे सकाळी रिकाम्या पोटी आल्याचा चहा घेतल्यास युरिक ॲसिड नियंत्रित ठेवण्यास मदत होते. याशिवाय हिवाळ्यात आल्याचा चहा पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.