लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. अनेकांना वजन तर कमी करायचे परंतु भुकेवर नियंत्रण मिळवता येत नाही. यासाठी ज्यांचं वजन वाढलेलं आहे अशा व्यक्तींनी खाद्यपदार्थांचं दोन गटात वर्गीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे.
Health Tips: निरोगी आरोग्यासाठी व्यायाम महत्त्वाचा, दररोज किती मिनिटे करावा?
लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ आणि हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे ज्या खाद्यपदार्थांचे सेवन केल्यानंतर त्यातील शर्करा रक्त शर्करेत लवकर विरघळण्यासाठी लागणारा कालावधी. जे खाद्यपदार्थ लवकर रक्तात रक्त शर्करा रिलीज करते त्यांना हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ असं म्हटलं जातं. ज्या खाद्यपदार्थांचा रक्त शर्करा रक्तात रिलीज करण्याचा वेग कमी आहे त्यांना लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ असे म्हटले जाते.
advertisement
लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये डाळी, पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य इत्यादींचा समावेश होतो. तर हाय इंडेक्स असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये साखर, भात, आंबा, टरबूज यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. वजन नियंत्रणात ठेवू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी भूक लागल्यास लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले खाद्यपदार्थ सेवन करावेत. ज्यामुळे त्यांची भूक नियंत्रणात राहील आणि वजन देखील वाढणार नाही. अशा पद्धतीने नागरिक भूक नियंत्रणात न ठेवताही आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतात, असं आहार सल्लागार डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी लोकल 18 शी बोलताना सांगितलं.