लाडूसाठी लागणारे साहित्य
एक वाटी डेसिकेटेड कोकोनट, अर्धा वाटी दूध, अर्धा वाटी मिल्क पावडर, दोन चमचे साजूक तूप, साखर (चवीनुसार), वेलची पूड, केसर आणि थोडेसे मनुके एवढे साहित्य यासाठी लागेल.
Beetroot Cutlet Recipe: शरिरासाठी हेल्दी, नाश्त्याला बनवा बीटाचे स्वादिष्ट कटलेट, रेसिपीचा Video
लाडू करण्याची कृती
सगळ्यात पहिले एका पॅनमध्ये दोन चमचे तूप घालून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये खोबऱ्याचा कीस टाकायचा आणि हे मिश्रण गोल्डन ब्राऊन होई पर्यंत भाजून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये तुमच्या चवीनुसार साखर टाकावी. साखर एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये अर्धा वाटी मिल्क पावडर टाकायचं. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकायची.
advertisement
मिश्रण एकजीव करून घ्यायचं. मिश्रण तयार झाल्यानंतर ते थोडंसं थंड होण्यासाठी बाजूला ठेवायचं. मिश्रण थंड झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लाडूचा आकार देऊ शकता. लाडू बांधून घेतल्यानंतर तयार केलेल्या लाडूला वरतून खोबऱ्याचं कोटिंग करून घ्यायचं. आणि सगळे अशाच पद्धतीने लाडू तयार करून घ्यायचे. लाडू तयार झाल्यानंतर त्यावरती तुम्ही मनुका ठेवू शकता किंवा तुमच्या आवडते कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही त्याच्यावर ठेवू शकता.
तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी साहित्यामध्ये हे लाडू बनवून तयार होतात. तर या रक्षाबंधनला नक्की तुम्ही हे लाडू घरी ट्राय करा, तुमच्या भावाला नक्कीच आवडतील.