पाणी पिण्याचे प्रमाण वाढवा
हिवाळ्यात शीत हवामान असल्याने फार कमी प्रमाणात तहान लागते. त्यामुळे आपण पाणी फार कमी प्रमाणात पितो. परंतु भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेला फायदा होतो.
अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा
advertisement
हिवाळ्यात थंडी असल्यामुळे आपल्यापैकी अनेकजण अतिशय गरम पाण्याने अंघोळ करतात. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल बाहेर पडते आणि त्वचा रूक्ष होते. कोमट पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला फायदा होतो.
चेहरा आणि त्वचेसाठी वेगवेगळे लोशन वापरा
अनेकजण त्वचेवर वापरण्यासाठी आणलेले लोशन चेहऱ्यावर किंवा ओठावर देखील लावतात. यामुळे त्वचा चिपचिप होते. पिंपल्स येऊ शकतात. म्हणून त्वचेसाठी आणि चेहऱ्यासाठी वेगवेगळे लोशन वापरावे.
लिंबूवर्गीय फळांचे सेवन करा
संत्रा, मोसंबी, पपई यांसारख्या फळांचे सेवन आवर्जून करा. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. ज्यामुळे त्वचेला चांगला फायदा होतो.
वारंवार चेहरा धुणे टाळा
चेहरा सातत्याने धुतल्याने देखील त्वचा रखरखीत होते. त्यामुळे दिवसातून दोन वेळाच चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. फार जास्त वेळा चेहरा धुणे टाळा, असं डॉ. अमृता कुलकर्णी सांगतात.





