कशी घ्यावी काळजी?
जर तुमची स्किन ही ड्राय असेल तर तुम्ही रोज रात्री झोपण्याआधी ग्लिसरीन आणि गुलाब जल एकत्र करून छान चेहऱ्याला लावून झोपू शकता. यामुळे तुमची त्वचाही ड्राय होणार नाही आणि ग्लो करायला लागेल. जर तुमची स्किन ही ऑयली असेल किंवा पिंपल्स असतील तर तुम्ही विटामिन ई ची गोळी आणि थोडसं एलोवेरा जेल मिक्स करून चेहऱ्याला लावाल. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची पिंपल्स कमी व्हायला चेहऱ्यावरील ऑइल कमी व्हायला मदत होते, असं दर्शना देशमुख सांगतात.
advertisement
परिसरात असायलाच हवी 'ही' 5 झाडे; आपल्या आरोग्यासाठी आहेत वरदान
याच बरोबर आपण आलूचा फेस पॅक देखील तयार करू शकतो. एक आलू घ्यायचा. तो किसून पाण्यामध्ये टाकायचा त्यानंतर आलू बाहेर काढून घ्यायचा आणि पाण्यामध्ये जो आलूचा खाली स्टार्च जमा होतो तो आपण आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे सुद्धा तुमचं स्किन ही ग्लो करेल. त्यानंतर तुम्ही दुसऱ्या फेस पॅकमध्ये दही आणि हळद मिक्स करून हा फेसपॅक पंधरा मिनिटे चेहऱ्याला लावायचा. त्यानंतर हलक्या हाताने चेहऱ्याला मसाज करा यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स वाईट हेड्स हे निघून जातील, असंही दर्शना देशमुख सांगतात.
नपुंसकता, अशक्तपणा करते दूर; आजारांचा जणू यमराज आहे ही वनस्पती
मध आणि एलोवेरा जेल मिक्स करून लावलं तर सुद्धा चेहरा हा चांगला होतो. विटामिन सीची कॅप्सूल आणि बदाम तेल एकत्र करून हलक्या हाताने मसाज केली तर चेहऱ्यावरती चांगला ग्लो हा येतो. मुलतानी माती मध्ये थोडेसे हळद, दही आणि अंड्यातील पांढरा गर एकत्र करून हा फेस पॅक चेहऱ्याला लावला पंधरा-वीस मिनिटं ठेवल्यानंतर सुद्धा तुमचा चेहरा हा गलो आणि शाईन करायला लागतो, अशी दर्शना देशमुख यांनी दिली.