कोरफडही डोळ्यांखाली साध्या पद्धतीने लावता येते. यामुळे काळी वर्तुळे कमी होऊ शकतात. कोरफडीचा ताजा पल्प किंवा कोरफड जेल घ्या आणि डोळ्यांखाली हळू घासा. कोरफड 15 ते 20 मिनिटं काळ्या वर्तुळांवर ठेवा किंवा तुम्ही रात्रभर ठेवू शकता. तसंच कोरफडीसोबत काही जिन्नसांचं मिश्रण लावणं देखील काळी वर्तुळं कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. पाहूयात काही पर्याय.
advertisement
कोरफड आणि बटाट्याचा रस
बटाट्याच्या रसातील नैसर्गिक ब्लीचिंग गुणधर्म काळी वर्तुळं कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. एका भांड्यात अर्धा चमचा कोरफड जेल टाका आणि त्यात २ चमचे बटाट्याचा रस घाला. ही पेस्ट मिक्स करून काळ्या वर्तुळांवर १५ मिनिटं लावा आणि नंतर धुवा. काही दिवस ते लावल्यानंतर डोळ्यांभोवतीची त्वचा सुधारण्यास सुरुवात होईल.
Hair care : कोरड्या केसांची काळजी कशी घ्यावी ? घरच्या घरी तयार करा हेअरमास्क
कोरफड आणि गुलाब पाणी
कोरफड जेल आणि गुलाब पाणी समान प्रमाणात मिसळा आणि काळ्या वर्तुळांवर लावा. 10 मिनिटं ठेवल्यानंतर
धुवा. काळी वर्तुळं कमी होतात आणि त्वचेचा कोरडेपणा दूर होतो.
कोरफड आणि मध
अँटी-ऑक्सिडंटनं समृद्ध असलेलं हे मिश्रण काळी वर्तुळं दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. अर्धा चमचा एलोवेरा जेलमध्ये अर्धा चमचा मध मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट डोळ्याभोवती लावा आणि १५ ते २० मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. हे मिश्रण आठवडाभर लावल्यानंतर काळी वर्तुळं बऱ्याच प्रमाणात दूर होतील.
Peanuts : शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये ? आयुर्वेदानुसार काय योग्य आणि काय अयोग्य ?
कोरफड आणि हळद
काळी वर्तुळं कमी करण्यासाठी हळदीतील औषधी गुणधर्म प्रभावी आहेत. अशा स्थितीत कोरफड
आणि हळद मिसळून लावल्यानंतरही काळी वर्तुळं कमी होऊ लागतात. अर्धा चमचा कोरफडीमध्ये चिमूटभर हळद मिसळून डोळ्यांखाली चोळा. काळी वर्तुळं कमी होण्यासाठी याचा नक्की उपयोग होईल.